पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे पक्षाची ताकद विभागली गेली असून, स्वबळावर निवडणूक जिंकणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे आपली राजकीय जागा टिकवण्यासाठी राष्ट्रवादीतील दोन्ही गटांमधील नेते व इच्छुक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र दिसत आहे.अशातच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे.अधिकच्या माहितीनुसार, प्रशांत जगताप हे लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असून, याबाबतचा अंतिम निर्णय ते येत्या दोन दिवसांत जाहीर करू शकतात. त्यांच्या संभाव्य निर्णयामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Amidst PMC elections, Pune NCP's Prashant Jagtap may resign, joining another party. Political shifts are anticipated following this decision. The party faces challenges due to divisions and leaders potentially joining BJP.
Web Summary : पीएमसी चुनावों के बीच, पुणे राकांपा के प्रशांत जगताप इस्तीफा दे सकते हैं, किसी अन्य पार्टी में शामिल हो सकते हैं। इस फैसले के बाद राजनीतिक बदलावों की आशंका है। विभाजन और नेताओं के संभावित रूप से भाजपा में शामिल होने के कारण पार्टी को चुनौतियों का सामना करना पड़ रहा है।