पुणे : महापालिका निवडणुकीत १२० नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष ठेवलेल्या भाजपने निष्ठावंतांना डावलून आयारामांना उमेदवारी दिल्याने काही प्रभागांतील जागा धोक्यात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचार सभेसाठी पुण्यात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील काही वरिष्ठ नेत्यांची शाळा घेतली असून धोकादायक जागांकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.
नऊ वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सर्वाधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या. भाजपनेही या निवडणुकीत १२० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष ठेवून ज्या प्रभागात पक्षातील ताकद कमी आहे, तेथे इतर पक्षांतील प्रबळ नेत्यांना व इच्छुकांना गळाला लावले. स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता पक्ष प्रवेश केल्याने काहीशी नाराजी व वादावादी झाली होती. दुसरीकडे भाजपने चाळीस माजी नगरसेवकांची तिकिटे कापत आयारामांना तिकिटे दिली. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तयारी करत असलेल्या स्वपक्षाच्या इच्छुकांना डावलण्यात आले. या इच्छुकांची नाराजी आणि पक्षांतर करून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून विरोधात उभे ठाकलेले भाजप उमेदवारांची डोकेदुखी ठरत आहे. यामुळे काही प्रभागात भाजपची पिछेहाट होत असल्याचे सर्व्हेमध्ये समोर आल्याची चर्चा आहे.
भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कात्रज येथे जाहीर सभा घेतली. सभा आटोपल्यानंतर ते विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत शहरातील काही वरिष्ठ नेते होते. विमानतळावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांची बंद दाराआड शाळा घेतली. तसेच मागे पडत असलेल्या आणि धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या जागांकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले.
Web Summary : With PMC elections looming, CM Fadnavis reportedly reprimanded BJP leaders regarding vulnerable seats. Internal dissent over candidate selection, favoring newcomers over loyalists, threatens BJP's target of 120 corporators. The CM urged leaders to address these critical areas urgently.
Web Summary : पीएमसी चुनावों के बीच, मुख्यमंत्री फडणवीस ने कथित तौर पर जोखिम वाली सीटों के बारे में भाजपा नेताओं को फटकार लगाई। उम्मीदवारों के चयन पर आंतरिक असंतोष, वफादारों पर नए लोगों को तरजीह देना, भाजपा के 120 पार्षदों के लक्ष्य को खतरे में डालता है। मुख्यमंत्री ने नेताओं से इन महत्वपूर्ण क्षेत्रों को तत्काल संबोधित करने का आग्रह किया।