शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026: पुण्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या प्रभागात ‘नोटा’चा जोर; १४ टक्के नागरिकांनी उमेदवारांना नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:25 IST

PMC Election Results 2026 सत्तेसाठी सुरू असलेली उमेदवारांची पळवापळवी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना दिलेली उमेदवारी आणि राजकीय अट्टहास याबाबत मतदारांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली

बाणेर: पुणे महापालिकेच्या एकूण ४१ प्रभागांपैकी सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) मध्ये ‘नोटा’ला मिळालेल्या प्रतिसादाने राजकीय पक्षांची चिंता वाढवली आहे. या प्रभागात एकूण १ लाख ५६ हजार ४० मतदार असून, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मतदान केलेल्या ८२ हजार ६७६ मतदारांपैकी तब्बल ११ हजार ५७६ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. त्यामुळे एकूण १४ टक्के मतदारांनी थेट उमेदवारांना नाकारत नाराजी व्यक्त केली आहे.

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी या भागांचा समावेश असलेल्या या प्रभागात बाणेर-बालेवाडी परिसर, तसेच हिंजवडी आयटी पार्क जवळ असल्याने उच्चशिक्षित व आयटी क्षेत्रातील मतदारांचे प्रमाण मोठे आहे. सत्तेसाठी सुरू असलेली उमेदवारांची पळवापळवी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना दिलेली उमेदवारी आणि राजकीय अट्टहास याबाबत मतदारांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली.

आकडेवारीनुसार अ गटात ५,१२३, ब गटात १,३२४, क गटात ३,०४५ तर ड गटात २,०८४ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या ‘नोटा’ सुविधेचा वापर प्रत्येक निवडणुकीत वाढत असून, हे राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा असल्याचे संकेत या निकालातून मिळत आहेत.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भागातील जागरूक नागरिकांनी ‘नागरिक जाहीरनामा – मत देण्याआधी मत मांडूया’ हा उपक्रम राबवला होता. बाणेर-बालेवाडी नागरिक मंच आणि बाणेर-बालेवाडी-पाषाण रेसिडेंट्स असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष परिसरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. “तुम्हाला तुमचा परिसर कसा हवा आहे?” या एका प्रश्नाला तब्बल ६,४०० हून अधिक नागरिकांनी प्रतिसाद दिला. हा सहभाग केवळ संख्यात्मक नसून प्रशासनाने आणि राजकीय पक्षांनी नागरिकांचे म्हणणे ऐकावे, अशी ठोस अपेक्षा व्यक्त करणारा होता. निवडून येण्याच्या नावाखाली पक्षनिष्ठेऐवजी केवळ निवडणूक जिंकण्याच्या शक्यतेवर उमेदवारी देणे, अन्य पक्षांतील उमेदवारांना पळवणे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना तिकीट देणे तसेच निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्न यामुळे मतदारांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये ‘नोटा’ला मिळालेला विक्रमी प्रतिसाद हा मतदारांच्या असंतोषाचा स्पष्ट संदेश मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune 2026 Election: 'NOTA' Dominates High-Voter Ward, Rejects Candidates.

Web Summary : In Pune's Ward 9, 'NOTA' garnered 14% of votes, signaling voter dissatisfaction. High voter turnout and educated residents reflect discontent with candidate selection, criminal backgrounds, and political maneuvering, prompting citizens to demand better governance and responsiveness from elected officials.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६BanerबाणेरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका