शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026: पुण्यात २०१७ मध्ये १० जागा; आता काँग्रेस अन् मनसेसोबत युती तरी एकाच जागेवर पेटवली मशाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 15:44 IST

PMC Election Results 2026 भाजपच्या विरोधात प्रमुख भूमिका घेणाऱ्या उद्धवसेनेने काँग्रेस आणि मनसेसोबत युती करून महापालिका निवडणूक लढवली. परंतु, यात फारशे यश मिळाले नाही

पुणे : महापालिका निवडणुकीत उद्धवसेना, काँग्रेस आणि मनसे आघाडीने पहिल्यांदाच एकत्रित पुणे महापालिका निवडणुकीला सामोरे गेले आहेत. परंतु, २०१७ मध्ये १० जागा जिंकणाऱ्या उद्धवसेनेला यंदाच्या निवडणुकीत केवळ एकच जागा जिंकता आल्याने भाजपच्या लाटेतही एका जागेवर मशाल पेटवल्याचे चित्र आहे. शहरातील प्रभाग क्र. १६ क मध्ये उद्धवसेनेचे नितीन निवृत्ती गावडे यांनी विजय मिळवत शहरात मशाल धगधगती ठेवली आहे.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेत फूट पडली नव्हती. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. तरीही केवळ १० जागाच जिंकता आल्या होत्या. २०२२ च्या पक्षफुटीनंतर शिवसेनेत उद्धवसेना आणि शिंदेसेना अशी फूट पडली. यामध्ये मत विभागणी झाली. भाजपच्या विरोधात प्रमुख भूमिका घेणाऱ्या उद्धवसेनेने काँग्रेस आणि मनसेसोबत युती करून महापालिका निवडणूक लढवली. परंतु, यात फारशे यश मिळाले नाही. उद्धवसेनेच्या कल्पना थोरवे, माजी आमदार पुत्र प्रसाद बाबर, रूपेश मोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रमुख उमेदवारांचा पराभव झाल्याने उद्धवसेनेच्या जागा घटल्या. शिवाय काँग्रेस आणि मनसेसोबत युतीचा फायदा झाला नसल्याचे दिसून आले. तसेच पुण्यात उद्धवसेनेच्या एकाही मोठ्या नेत्याची सभा न झाल्याने त्याचाही फटका उद्धवसेनेला बसला आहे. भविष्यात पुण्यात उद्धवसेनेला तग धरण्यासाठी स्थानिक पातळीवर पक्ष बांधणीसह वरिष्ठांकडून वेळ देणे आवश्यक आहे. शिवाय मूळच्या शिवसैनिकांना विश्वासात घेऊन पक्ष बळकट करणे आवश्यक आहे. अन्यथा उद्धवसेनेची अवस्था बिकट होण्यास वेळ लागणार नाही.

प्रभाग क्रमांक १६ चे विजयी उमेदवार 

बनकर वैशाली सुनिल    राष्ट्रवादीजंगले उज्वला सुभाष    भाजपगावडे नितीन निवृत्ती    शिवसेना(UBT)तुपे मारुती शिवाजी    भाजप

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Election: Uddhav Sena wins one seat despite alliance in Pune.

Web Summary : Despite allying with Congress and MNS, Uddhav Sena won only one Pune seat, down from ten in 2017. Internal divisions and lack of senior leaders' rallies impacted performance, requiring stronger local efforts.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेMunicipal Corporationनगर पालिका