शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
4
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
5
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
6
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
7
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
9
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
10
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
11
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
12
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
13
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
14
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
15
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
16
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
17
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
18
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
19
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
20
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026 : आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहावा;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:26 IST

- चर्चा जेवढी मागे जाईल तेवढ्या अडचणी निर्माण होतील, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना दिला.

पुणे : अनेकजण महापालिकेत सत्ता असताना आम्ही काय केले, ते विचारत आहेत. त्यांनी आम्हाला विचारण्यापूर्वी आरसा पाहावा आणि आपण काय केले? याचा विचार करावा. मात्र, चर्चा जेवढी मागे जाईल तेवढ्या अडचणी निर्माण होतील, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना दिला.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेते व अजित पवार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अजित पवार विविध सभा व पत्रकार परिषदांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्ता काळात विकास न होता, भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सोमवारी कात्रज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाव न घेता, अजित पवार यांना सूचक इशारा देत महापालिका निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आम्हाला राजकारण नाही तर शहराचा विकास करायचा असल्याचे नमूद केले.

फडणवीस म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर असून, राज्याचे आर्थिक इंजिन आहे. मागील पाच वर्षांत पुणे महापालिकेत सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास केला आहे. पुढील पाच वर्षांत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ८० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबविण्यासाठी विकास आराखडा तयार केला आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, रिंग रोड, ५४ किमी भुयारी मार्ग, तसेच इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टिम योजना राबविण्यात येणार आहे. एआय आधारित सीसीटीव्ही, स्मार्ट शाळा आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील पाच वर्षांत आम्ही ठोस काम केले, त्यामुळे शहरात आमूलाग्र बदल झाला. मात्र, त्यापूर्वी सत्तेत असणाऱ्यांनी व अनेक वर्षे पालकमंत्री असणाऱ्यांनी दूरदृष्टी न ठेवता कारभार केला, त्यामुळे शहरात समस्या निर्माण झाल्या.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मागील निवडणुकीत बहुमत मिळून सलग पाच वर्षे भाजपला सत्ता दिली. त्यामुळे अनेक विकासकामे सुरू झाली. मात्र, अजित पवार मागील काही दिवस विकासकामांच्या नावाने भाजपवर टीका करत आहेत. परंतु अजित पवार अनेक वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी त्यांच्या काळात भरीव विकास का केला नाही? अशी विचारणा जनता आता करत आहे. 

वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठी तरतूद करणार आहे. त्यामध्ये भुयारी मार्गांचे जाळे निर्माण केले जाईल, त्यासाठी ३२ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल तसेच पुणे शहराचा विचार करता शहरात क्षेत्रफळाच्या तुलनेत केवळ ९ टक्के क्षेत्रावर रस्ता आहे. ही टक्केवारी वाढविली जाईल. शहरातील ३२ रस्त्यांवर शहरातील ८० टक्के वाहतूक होत असून, त्या रस्त्यांचे रुंदीकरण करणे, वाहतुकीचे अडथळे दूर करणे आदी उपाययोजना केल्या जातील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करण्यासाठी चार हजार इलेक्ट्रीक बसेस घेण्यात येतील. पुणे शहरातून इतर शहरांत जाणाऱ्या महामार्गांवर दुहेरी उड्डाणपूल, मेट्रोचे जाळे, आदी उभारणी केली जाईल.  - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Look in the mirror, Fadnavis slams Pawar over PMC performance.

Web Summary : Fadnavis indirectly criticized Ajit Pawar, urging self-reflection on PMC tenures. He highlighted BJP's development plans for Pune, including infrastructure projects and improved transportation. Previous administrations lacked vision, causing problems, leaders claimed.
टॅग्स :Municipal Corporationनगर पालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६