शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: शिवसेनेला कमी लेखणाऱ्यांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:04 IST

PMC Election 2026 नगरपरिषदेमध्ये काही लोकं म्हणाले की, शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे. पण आम्ही दाखवले शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत आहे

पुणे : पुण्यात शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाली असून मनसे उद्धवसेनेची युती झाली आहे. या महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षप्रमुखांकडून जोरदार प्रचार सभाही घेतल्या जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांची आज कात्रज येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभाही संपन्न झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. शिवसेनेला कमी लेखणाऱ्या विरोधकांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

शिंदे म्हणाले, आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन या निवडणुकीत उतरले आहोत. विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये. शिवसेना एक मजबूत पक्ष आहे. नगरपरिषदेमध्ये काही लोकं म्हणाले की, शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे. पण आम्ही दाखवले शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत आहे. आणि जे आता विरोधक आहेत. जे आमच्या विरोधामध्ये काही मोठी मोठी भाष्य करत आहेत. शिवसेनेला कमी लेखत आहेत. पण मी आपल्याला एवढंच सांगतो की, शिवसेनेला बोलणाऱ्या विरोधकांना देखील कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

आपला अजेंडा विकास आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणे आहे. अनेक कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या आहेत. चांदणी चौकात खूप ट्राफीक होत असते. मी इथून जाताना लोकांनी मला थांबवून या व्यथा सांगितल्या होत्या. मी तातडीने सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आता तिकडचं ट्राफिक दूर झालं आहे. कात्रजच ट्राफिक दूर करणार आहोत. विधानसभेच्या पहिल्या भाषणात सांगितलं होत, कि आम्ही २०० पार करणार तेव्हा २३२ आणले. शेवटी सर्व काही जनतेच्या हातात आहे. एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरु केली. अनेकांनी त्याला विरोध केला. पण तुमचा एकनाथ खमक्या भाऊ बसला होता. त्यामुळे ती सुरु झाली. कोणी माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. एक बार मैने कमिटमेंट कर दि तो मैं अप ने आप कि भी नाही सुनता असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Election 2026: Shinde Warns Rivals, Promises Development in Pune

Web Summary : Eknath Shinde, on Pune tour, asserted Shinde Sena's strength in upcoming PMC elections. He promised development, traffic solutions, and continuation of welfare schemes like the 'Ladki Bahin' योजना, vowing to defeat those underestimating Shiv Sena.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीkatrajकात्रजPoliticsराजकारण