पुणे - पुण्यात ४१ प्रभागांच्या १६३ जागांसाठी लढत होत असून १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये ३२ प्रभागांच्या १२८ जागांसाठी लढत होत असून ६९२ उमेदवार उमेदवार रिंगणात आहे. दोन्हीकडे सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पुण्यात शेवटचे २ तास राहिले असताना मतदान अत्यंत संथ गतीने होताना दिसत आहे. आतापर्यंत केवळ ३९ टक्के मतदान झाले आहे पुणे आणि पिंपरीच्या काही भागात मशीन बंद पडल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी पुन्हा दुरुस्त करून मतदानाला सुरुवात झाली आहे. अशात उत्तमनगर येथील मतदान केंद्र ७८ मध्ये तुतारी समोरील बटण दाबले जात नसल्याची तक्रार एका मतदाराने केली. त्यामुळे ९ वाजण्याच्या सुमारास येथील एका केंद्राचे मतदान काही काळ थांबविण्यात आले होते. यामुळे येथील वातावरण गोंधळाचे झाले होते.मशीन बंद पडल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. ज्येष्ठांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मतदार केंद्राबाहेर सेल्फी पॉईंट बसवण्यात आले आहे. नागरिक मतदानानंतर याठिकाणी सेल्फी काढताना दिसून येत आहेत. पोलिसांकडून अपंग, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यास मदत होते आहे.
Web Summary : Voting stalled at Uttamnagar booth 78 in Pune due to button issues. Only 39% voter turnout recorded. Machine malfunctions elsewhere caused delays. Citizens, especially senior citizens, expressed frustration.
Web Summary : पुणे के उत्तम नगर बूथ 78 में बटन की समस्या से मतदान रुका। केवल 39% मतदान दर्ज किया गया। अन्य स्थानों पर मशीन की खराबी से देरी हुई। नागरिकों, विशेषकर वरिष्ठ नागरिकों ने निराशा व्यक्त की।