शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: नाव एका ठिकाणी, मतदान दुसरीकडे..! पुण्यातील कसबा पेठेतील मतदाराची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:14 IST

- पुणे–पिंपरीत मतदानाची टक्केवारी वाढीच्या दिशेने; दुपारनंतर मतदारांचा उत्साह

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मतदानाचा उत्साह हळूहळू वाढताना दिसून आला. सकाळच्या वेळेत मतदानाचा वेग कमी असला तरी दुपारनंतर मतदार केंद्रांवर रांगा वाढल्या. पहिल्या टप्प्यात सकाळी पहिल्या दोन तासांत पुण्यात सरासरी ५.५ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ७ टक्के मतदान नोंदवले गेले. दुसऱ्या टप्प्यात सकाळी ११.३० वाजेपर्यंत पुण्यात मतदानाची टक्केवारी १२ टक्क्यांवर, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १६.०३ टक्क्यांपर्यंत पोहोचली.तिसऱ्या टप्प्यात दुपारी १.३० वाजेपर्यंत पुण्यात २६.२८ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये २८.१५ टक्के मतदान झाले. दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात पुण्यात एकूण ३९ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.मतदान प्रक्रियेत तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटकांचा सहभाग दिसून आला. अनेक ज्येष्ठ नागरिक रिक्षा, खासगी वाहनांच्या सहाय्याने मतदान केंद्रांवर पोहोचताना दिसले. काही ठिकाणी मतदार यादीतील बदल आणि मतदान केंद्र बदलल्यामुळे नागरिकांचा गोंधळ झाला.कसबा पेठेतील मतदार प्रविणी नाईक यांनी सांगितले, “मतदान केंद्र दुसऱ्या परिसरात हलवण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ झाला. नाव कसबा पेठेत होते, पण मतदान दुसरीकडे. जवळपास अर्धा दिवस शोधण्यात गेला. मी १८ वर्षांपासून मतदान करते, पण असा अनुभव पहिल्यांदाच आला.” प्रशासनाकडून मतदारांना मतदान केंद्राची माहिती वेळेवर देण्याची गरज असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले. तर प्रियंका गायकवाड यांनी सांगितले, 'यंदा प्रथमच मतदानाचे केंद्र अचानक बदलल्यामुळे खूप मोठा गोंधळ उडाला आणि त्यामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. इतकी वर्षे एकाच ठिकाणी मतदान केल्यानंतर असा बदल होणे अनपेक्षित होते. प्रशासनाने नियोजनात सुधारणा करणे गरजेचे आहे. घरातील काहींचे मतदान दुसऱ्या मतदान केंद्रावर तर काहींचे दुसऱ्या ठिकाणी यामुळे नाहक वेळ देखील गेला.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Election: Voters Frustrated as Polling Locations Shifted, Confusion Ensues.

Web Summary : Pune & Pimpri-Chinchwad saw decent voter turnout. Confusion arose from shifted polling places. Kasba Peth voter spent half-day searching for new location. Citizens urge timely information.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६PuneपुणेElectionनिवडणूक 2026pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान