पुणे : पुण्यात ४१ प्रभागांच्या १६३ जागांसाठी लढत होत असून १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये ३२ प्रभागांच्या १२८ जागांसाठी लढत होत असून ६९२ उमेदवार उमेदवार रिंगणात आहे. दोन्हीकडे सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पुण्यात शेवटचे २ तास राहिले असताना मतदान अत्यंत संथ गतीने होताना दिसत आहे. आतापर्यंत केवळ ३९ टक्के मतदान झाले आहे
पहिल्या टप्प्यात पुण्यात पहिल्या २ तासात सरासरी ५.५ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्या २ तासांत सरासरी ७ टक्के मतदान झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यात ११.३० वाजेपर्यंत पुण्यात १२ टक्के तर पिंपरीत सरासरी १६.०३ टक्के मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात दीड वाजपर्यंत पुण्यात २६.२८ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये दीड वाजेपर्यंत २८.१५ टक्के मतदान झाले आहे. मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत. ज्येष्ठ नागरिक रिक्षा, गाडीने मतदानाला येत आहेत. शेवटचे २ तास बाकी असताना सर्व मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरीच्या काही भागात मशीन बंद पडल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी पुन्हा दुरुस्त करून मतदानाला सुरुवात झाली आहे. मशीन बंद पडल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. ज्येष्ठांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मतदार केंद्राबाहेर सेल्फी पॉईंट बसवण्यात आले आहे. नागरिक मतदानानंतर याठिकाणी सेल्फी काढताना दिसून येत आहेत. पोलिसांकडून अपंग, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यास मदत होते आहे.
Web Summary : Pune and Pimpri-Chinchwad witnessed slow voting for PMC elections. Pune recorded 39% and Pimpri 40.5% turnout with two hours remaining. Technical glitches caused delays, but citizens actively participated, utilizing selfie points after voting.
Web Summary : पुणे और पिंपरी-चिंचवड में पीएमसी चुनावों के लिए मतदान धीमा रहा। पुणे में 39% और पिंपरी में 40.5% मतदान हुआ, जबकि दो घंटे बाकी थे। तकनीकी खराबी के कारण देरी हुई, लेकिन नागरिकों ने सक्रिय रूप से भाग लिया, मतदान के बाद सेल्फी पॉइंट का उपयोग किया।