पुणे : महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांची युती झाली असून पक्षाला पुणे महानगरपालिका निवडणुकीत ९ जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ६ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश असून संतुलन राखण्यात आले आहे. आरपीआयच्या उमेदवारांमध्ये ५ बौद्ध, ३ मातंग आणि एक धनगर उमेदवारी दिली आहे.
आरपीआय व भाजपा युती म्हणून महापालिका निवडणुका लढवणार असून पुणे महापालिकेवर भाजप-आरपीआयची सत्ता येईल असा विश्वास शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, मोहन जगताप, महिला अध्यक्ष हिमाली कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, रिपाइंकडून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये राहुल भंडारे, प्रभाग २ अ - रेणुका चलवादी, प्रभाग २ ब - सुधीर वाघमारे, प्रभाग ६ संतोष आरडे, प्रभाग ७ निशा मानवदकर, प्रभाग ८ परशुराम वाडेकर, प्रभाग १३ निलेश आल्हाट, प्रभाग १४ हिमाली कांबळे आणि प्रभाग २२ मधून बापू कांबळे यांचा समावेश आहे.
Web Summary : BJP and RPI (Athawale) alliance for Pune PMC election, RPI gets 9 seats. Leaders express confidence in winning, aiming for power in Pune.
Web Summary : पुणे पीएमसी चुनाव के लिए भाजपा और आरपीआई (अठावले) गठबंधन; आरपीआई को 9 सीटें मिलीं। नेताओं ने पुणे में सत्ता हासिल करने के लिए जीतने का विश्वास जताया।