शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Pune Municipal Election 2026: पुण्यात भाजपनं खातं उघडलं; सिंहगड रोड भागातून मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:14 IST

Pune Municipal Election results 2026 प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी - माणिकबाग) मध्ये ब व ड गटाच्या भाजपच्या उमेदवार मंजुषा दीपक नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे

धायरी: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सिंहगड रस्ता परिसरात भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी - माणिकबाग) मध्ये ब व ड गटाच्या भाजपच्या उमेदवार मंजुषा दीपक नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी नाट्यमयरित्या माघार घेतल्याने भाजपचा विजय सुकर झाला.

​नागपुरें व  जगतापांची 'हॅट्ट्रिक'...

​प्रभाग ३५ मध्ये भाजपच्या मंजुषा नागपुरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अयोध्या शशिकांत पासलकर यांनी शड्डू ठोकला होता. मात्र, आज दुपारी अचानक पासलकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. नागपुरे या आता तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून महापालिकेत जाणार असून त्यांनी विजयाची 'हॅट्ट्रिक' साधली आहे. ​दुसरीकडे, भाजपचे दुसरे उमेदवार श्रीकांत जगताप यांच्यासाठीही ही निवडणूक सुखद ठरली. त्यांनीही हॅट्रिक साधली आहे.  त्यांच्या विरोधात उभे असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार नितीन गायकवाड यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जगताप यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.

​विरोधकांना मोठा धक्का...

​या प्रभागात महाविकास आघाडी तर्फे जोरदार लढत दिली जाईल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सिंहगड रस्ता हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, या बिनविरोध निवडीमुळे पक्षाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP opens account in Pune PMC election; Nagpurre elected unopposed.

Web Summary : BJP secured its first seat in Pune PMC election as Manjusha Nagpurre won unopposed from Sinhagad Road. She represents Suncity Manik Baug.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपाMahayutiमहायुतीPoliticsराजकारणWomenमहिलाElectionनिवडणूक 2026