शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
2
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
3
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
4
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
5
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
6
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
7
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
8
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
9
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
10
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
11
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
12
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
13
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
14
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
15
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
16
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
17
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
18
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
19
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
20
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: पुण्यात निवडणुकीच्या नाकाबंदी दरम्यान सापडले तब्बल ६७ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:19 IST

PMC Election 2026 रक्कम सासवड तालुक्यातील तक्रारवाडी येथील गट क्रमांक १३५ ही जमीन खरेदी करण्यासाठी रोख स्वरूपात देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले आहे

कात्रज/धनकवडी : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कात्रज येथील सर्व्हिलंन्स स्कॉड टीमने (एसएसटी) नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई केली आहे. कात्रज जंक्शन येथील एसएसटी नाकाबंदी पॉईंटवर तपासणी दरम्यान टोयोटा हायरायडर चारचाकी वाहनातून तब्बल ६७ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. संबंधित वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे.  शुक्रवारी  (दि. २ ) सकाळी एसएसटी पथक प्रमुख अधिकारी आरोग्य निरीक्षक योगेश सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. 

तपासणी दरम्यान एमएच १२ व्ही.झेड. ४०१४ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची टोयोटा हायरायडर कार थांबवण्यात आली. वाहनात मालक तुषार विजय मिरजकर ( ३९, रा. सासवड, पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासोबत वाहनात अनिल शंकर कामठे आणि गणेश बाळासाहेब जगताप हे दोघे उपस्थित होते. वाहनाच्या मागील डिकीत तपासणी केली असता लाल रंगाच्या पिशव्यांमध्ये विविध चलनी नोटांचे बंडल आढळून आले. चौकशी दरम्यान चालकाने ही रक्कम सासवड तालुक्यातील तक्रारवाडी येथील गट क्रमांक १३५ ही जमीन खरेदी करण्यासाठी रोख स्वरूपात देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले.  मात्र, निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर रक्कमेची शहानिशा आवश्यक असल्याने पंचनामा करून रक्कम जप्त करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई पंचांच्या व पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आली असून रोकड सीलबंद करून ताब्यात घेण्यात आली आहे. संबंधित टोयोटा हायरायडर वाहनही महानगरपालिकेच्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. प्रकरणाची माहिती नोडल अधिकारी श्रीपाद नाईक यांच्यामार्फत आयकर विभागाला देण्यात आली असून आयकर विभागाचे अधिकारी पुढील तपासासाठी घटनास्थळी दाखल होत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : ₹6.7 Million Seized During Election Check in Pune; Car Impounded

Web Summary : During election checks in Pune's Katraj, ₹6.7 million was seized from a car. The occupants claimed it was for a land deal, but due to the election code of conduct, the money and vehicle were impounded. The Income Tax Department is investigating.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६MONEYपैसाcommissionerआयुक्तIncome Taxइन्कम टॅक्स