शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
3
Municipal Corporation Election 2026 LIVE Updates: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०८ टक्के मतदान; पहा कुठे किती मतदान झाले?
4
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
5
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
6
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
7
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
8
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
9
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
10
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
11
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
12
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
13
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
14
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
15
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
16
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
17
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
18
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
19
ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026 : सकाळी कोणीतरी महिला आली अन् मतदान करून गेली; पुण्यात महिलेच्या नावावर आधीच झाले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:59 IST

पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग 21 मध्ये मतदान गोंधळ, महिलेच्या नावावर आधीच मत नोंदल्याचा आरोप

पुणे  - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी तब्बल १,१५३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून पुणेकरांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. मात्र, मतदानाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया (कल्याणी) हायस्कूल मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावावर आधीच मतदान झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

युवा काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी घटनास्थळीच व्हिडिओद्वारे माहिती देताना सांगितले की, संबंधित महिला मतदानासाठी केंद्रावर गेली असता तिला “तुमच्या नावावर आधीच मतदान झाले आहे” असे सांगण्यात आले. महिलेने याला तीव्र आक्षेप घेतल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.दरम्यान, संबंधित महिलेने आपला अनुभव सांगताना म्हटले, मी मतदानासाठी आत गेले असता कर्मचाऱ्यांनी माझे नाव तपासले आणि सांगितले की माझे मत आधीच टाकण्यात आले आहे. मी स्पष्ट सांगितले की मी अजून मतदान केलेले नाही. तरीही मला कागदपत्रे देऊन पुन्हा मतदान करण्यास सांगण्यात आले. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.”अक्षय जैन यांनी यावेळी मृत मतदारांच्या नावावरही मतदान होत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याचा दावा केला आहे. “प्रशासन एका विशिष्ट पक्षाला मदत करत आहे का?” असा सवाल उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, निवडणूक आयोग आणि प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Election Shocker: Woman's Vote Already Cast; Rigging Allegations Surface.

Web Summary : Pune's election faces scrutiny after a woman discovered her vote was already cast. Allegations of fraudulent voting and bias are surfacing, prompting calls for investigation into the integrity of the PMC election.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PuneपुणेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Maharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग