PMC: पीटी ३ अर्ज भरणाऱ्या ९० हजार मिळकधारकांना सवलतीचा लाभ
By निलेश राऊत | Updated: March 20, 2024 20:31 IST2024-03-20T20:31:32+5:302024-03-20T20:31:54+5:30
९० हजार मिळकतधारकांना सन २०२४-२५ च्या मिळकतकर बीलांमध्ये सवलत दिली जाणार आहे....

PMC: पीटी ३ अर्ज भरणाऱ्या ९० हजार मिळकधारकांना सवलतीचा लाभ
पुणे : राज्य सरकारने मिळकत करामधील सवलत कायम केल्यानंतर महापालिका प्रशासनाने ज्या नागरिकांना मिळकत कराची सवलत मिळाली नाही, अशा नागरिकांकडुन पीटी-३ अर्ज भरून घेतले होते. त्यामध्ये ९० हजार मिळकतधारकांना सन २०२४-२५ च्या मिळकतकर बीलांमध्ये सवलत दिली जाणार आहे.
याबाबत कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी माहिती दिली. ते म्हणाले, २०१८ ते २०२३ दरम्यान ज्या मिळकतींना (जे नागरिक स्वत: मिळकतीचा वापर करतात, त्यांना ) मिळकत करामध्ये ४० टक्के सवलत मिळाली नव्हती. मिळकतकराची सवलत रद्द झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, २०२३ मध्ये राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढून मिळकत करामधील सवलत कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील जे नागरिक स्वत:च्या मिळकतीचा वापर करतात व ज्यांनी भाडेकरू ठेवलेले नाही अशा मिळकतधारकांडून पीटी ३ अर्ज भरून मागविण्यात आले होते.
महापालिकेच्या कर विभागाच्या या आवाहनानुसार शहरातील ९० हजार मिळकतधारकांनी पीटी ३ अर्ज भरून दिले असून, त्यांच्या तपासणी अंती त्यांना येत्या आर्थिक वर्षापासून मिळकत करातील सवलत लागू करण्यात आली आहे. या सवलतीसह मिळकतकराची बीले १ एप्रिलपासून एमएमएस, मेल, ऑनलाईन तसेच स्पीड पोस्टव्दारे पाठविण्यात येणार आहेत.