शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

पंतप्रधान मोदी, तुम्ही आमचे शत्रू आहात- ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 21:27 IST

आपल्याशिवाय इतरांना संविधानाची काहीच माहितीच नाही, अशा थाटात मोदी वागतात.

पुणे: पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या डोळ्यावरची आणि बुद्धीवरची झापडं दूर करावीत. तुम्ही शरियतमध्ये ढवळाढवळ करून आमचा रोष ओढवून घेत आहात. तुम्ही आमचे शत्रू आहात, अशा शब्दांत एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. ते शनिवारी पुण्यात तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. यावेळी ओवेसी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या डोळ्यावरची आणि बुद्धीवरची झापडं दूर केली पाहिजेत. आजपर्यंतचा इतिहास पाहता तुम्हाला मुस्लिमांविषयी आपुलकी नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे तुम्ही तिहेरी तलाक विधेयकाच्यानिमित्ताने शरियतमध्ये ढवळाढवळ करून आमचा रोष ओढवून घेत आहात. तुम्ही आमचे शत्रू आहात, हे तुम्हाला सांगू इच्छितो. मात्र, ही गोष्ट पंतप्रधानांच्या कानापर्यंत पोहोचेल का, असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला. आपल्याशिवाय इतरांना संविधानाची काहीच माहितीच नाही, अशा थाटात मोदी वागतात. सर्व आजारांवर आपल्याकडे औषधे आहेत, असा त्यांचा समज आहे. मात्र, तिहेरी तलाकविरोधी विधेयक हे मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक आहे. आमचा विरोध हा तिहेरी तलाकविरोधातील सुधारणांना नाही, तर तो मोदी सरकारच्या विधेयकाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात तिहेरी तलाकचे प्रमाण घटले आहे. गेल्यावर्षी काढण्यात आलेल्या 3 लाख 40 हजार 206 फतव्यांपैकी फक्त 650 फतवे हे तिहेरी तलाकचे होते. कायदा करून तिहेरी तलाकसारख्या प्रथांना आळा बसणार असेल तर मग हुंडाबळी आणि इतर वाईट प्रथांविरोधातील कायद्यांचे काय? केवळ कायदा केल्याने गुन्हे थांबतात का?, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला. आज आमच्या भगिनींनी आंदोलन करून सरकारला आणि मुस्लिम पुरूषांना इशारा दिला आहे. जेणेकरून मुस्लिम पुरुष शरियतच्या रक्षणासाठी उभे राहतील, असे ओवेसी यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीtriple talaqतिहेरी तलाक