शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

पोतलेमळ्यात साडेतीन लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2015 03:20 IST

येथील पोतलेमळा परिसरात दरोडेखोरांच्या टोळक्याने घरावर दरोडा टाकून एकास डोक्याला गंभीर दुखापत करून १५ तोळे सोने, रोख २५ हजार रुपये व सहा मोबाइल,

शेलपिंपळगाव : येथील पोतलेमळा परिसरात दरोडेखोरांच्या टोळक्याने घरावर दरोडा टाकून एकास डोक्याला गंभीर दुखापत करून १५ तोळे सोने, रोख २५ हजार रुपये व सहा मोबाइल, असा ३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला़दरोडेखोरांच्या मारहाणीत हनुमंत रावजी पोतले (वय ५२, रा. शेलपिंपळगाव, पोतलेमळा) गंभीर जखमी झाले असून, चाकण येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री एक-दीडच्या सुमारास पोतलेमळा येथे घडली. रविवारी रात्री दीडच्या सुमारास हनुमंत पोतले यांच्या राहत्या घरावर पाच ते सहा दरोडेखोरांनी हल्ला करून घराच्या दरवाजावर लाकडाने, तसेच पायाने लाथा घालून दरवाजा तोडला व घरात प्रवेश केला. दरम्यान, रात्री चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. सोमवारी सकाळी सहायक पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील, पोलीस निरीक्षक दगडू पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे आदींनी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून श्वानपथकाकडूनही पाहणी करण्यात आली. दरम्यान, सहा दरोडेखोरांविरुद्ध चाकण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी दिली. या घटनेमुळे शेलपिंपळगाव परिसरासह शेजारील गावांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. हल्ल्यातील दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)