शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

PMPML: बीआरटी काढून पीएमपीएल प्रवाशांचे हाल वाढणार; स्वयंसेवी संस्थांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 15:39 IST

केंद्र सरकारच्या निधीमधून केलेला हा मार्ग काढून टाकणार तर मग केंद्रांचा निधीही परत करावा अशी उपरोधिक मागणीही या संघटनांनी केली आहे...

पुणे : प्रवाशांना सुलभपणे व विनाविलंब इच्छित स्थळी पोहचवणारी बीआरटी ( रस्त्याच्या मध्यभागातून काढलेला बससाठीचा स्वतंत्र मार्ग) काढून टाकण्याचा महापालिकेचा निर्णय पीएमपीएल प्रवाशांच्या हालात भर टाकणारा आहे अशी टीका स्वयंसेवी संस्था संघटनांनी केली आहे. केंद्र सरकारच्या निधीमधून केलेला हा मार्ग काढून टाकणार तर मग केंद्रांचा निधीही परत करावा अशी उपरोधिक मागणीही या संघटनांनी केली आहे.

सेव्ह पुणे ट्रॅफिक पुणे मुव्हमेंटचे हर्षल अभ्यंकर म्हणाले, “यातून महापालिका आयुक्तांचा खरा चेहरा समोर आला आहे. या मार्गामुळे पीएमपीएलच्या बस वाहतूक कोंडीन अडकत नव्हत्या. प्रवाशांना इच्छित स्थळी वेळेवर व विनाअपघात पोहचता येत होते. त्यामुळे बसच्या प्रवाशांसासाठी बीआरटी मार्ग वरदानच होता. मात्र वाढती वाहनसंख्या व त्यांच्या चालकांच्यचा दबावापुढे आयुक्त वाकले व लाखो प्रवाशांच्या हिताचा त्यांनी बळी दिला.”परिसर संस्थेचे रणजीत गाडगीळ, पर्यावरण शिक्षण संस्थेच्या संस्कृती मेनन तसेच सार्वजनिक प्रवासी वाहतूक या विषयाच्या तज्ज्ञ प्रांजली देशपांडे यांनीही महापालिकेच्या या निर्णयाविरोधात मत व्यक्त केले आहे.

हा निर्णय घेताना महापालिकेने कोणत्याही वाहतूक नियोजनकारांचा सल्ला घेतला नाही. वाहतूक कोंडीला उत्तेजन देणारे रस्ता रूंदी, वाहनतळ यासारखे प्रकल्प महापालिका राबवू इच्छित आहे. जगभर सार्वजनिक प्रवासी वाहतूकीचे प्रमाण वाढ‌वण्याचे धोरण घेतले जात असताना नेमके त्याच्या उलट धोरण महापालिका राबवत आहे. विरोध होऊ नये म्हणून बीआरटी काढण्याचा निर्णय प्रायोगिक स्तरावर आहे अशी धुळफेक महापालिका करत आहे. हा प्रयोग प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा आहे असे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले.

वाहतूक कोंडी खासगी वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने होते हे आता जगतील सर्व मोठ्या शहरांनी मान्य केले आहे व त्याला अनुषंगून ते सार्वजनिक प्रवासी वाहतूक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे माहिती असतानाही महापालिकेने सुरू असलेली बीआरटी बंद करण्याचा अनाकलनीय निर्णय घेतला. बीआरटी मार्ग केंद्र सरकारच्या निधीमधून तयार करण्यात आला. काही कोटी रूपये त्यासाठी खर्च करण्यात आले. आता हा मार्ग बंद करताना महापालिका तो निधी केंद्र सरकारला परत करणार आहे का? असा प्रश्न वाहतूक विषयाच्या अभ्यासकांनी केला आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड