साताजन्माच्या साथीबरोबर पर्यावरणरक्षणाची शपथ

By Admin | Updated: July 3, 2017 02:16 IST2017-07-03T02:16:24+5:302017-07-03T02:16:24+5:30

स्वत:च्या लग्नात अवास्तव खर्चाला फाटा देत सर्व वऱ्हाडी मंडळींना रोपवाटप करून सासवडची पर्यावरणप्रेमी आणि वाइल्ड फोटोग्राफी

Pledge of environmental protection with Satajjana | साताजन्माच्या साथीबरोबर पर्यावरणरक्षणाची शपथ

साताजन्माच्या साथीबरोबर पर्यावरणरक्षणाची शपथ

लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : स्वत:च्या लग्नात अवास्तव खर्चाला फाटा देत सर्व वऱ्हाडी मंडळींना रोपवाटप करून सासवडची पर्यावरणप्रेमी आणि वाइल्ड फोटोग्राफी करणारी अनिता संपतराव किंद्रे आणि भोर तालुक्यातील येवली गावचे निसर्गप्रेमी श्रीनाथ सीताराम खंडाळे यांनी अनोख्या पद्धतीने आपला विवाह सोहळा पार पाडला.
आजकाल मोठ्या थाटात आणि राजेशाही पद्धतीने विवाह साजरे होण्याच्या प्रकाराला छेद देत या पर्यावरणपूरक विवाहाची चर्चा सासवडमध्ये होती. वर श्रीनाथ आणि वधू अनिता यांनी सर्वांचा झाडाचे रोप देऊन वऱ्हाडी मंडळींना झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला. केवळ संदेश देऊन न थांबता दोघांनाही बोहल्यावर चढताना आयुष्यभर वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेतली. रुखवतातही चक्क झाडांना समाविष्ट केले होते.

Web Title: Pledge of environmental protection with Satajjana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.