शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

गोहत्याबंदी, नोटाबंदीच्या निर्णयावर नाटक यायला पाहिजे : माधव वझे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 12:45 PM

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रंगभूमीवर नाटक यायला पाहिजे होते...

ठळक मुद्देनाटककार घाबरतात आणि चालू दिले जाईल याची शाश्वती तरी काय?

पुणे : बदलत्या काळात राजकारणाशी निगडित नाटक लिहिले जात नाही. खरतर आता  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रंगभूमीवर नाटक यायला पाहिजे होते. मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदी आणि गोहत्याबंदी वरच्या निर्णयावर नाटक येऊ शकले असते. पण आणलं तर ते करणार कोण? आणि आणलं तरी चालू देतील का? याची शाश्वती काय? सध्या गढूळ वातावरण तयार झाले आहे. जे रंगभूमी आणि लोकशाहीसाठी चांगले नाही, याचा निषेध करायला हवा, अशा शब्दात ज्येष्ठ नाट्य अभ्यासक माधव वझे यांनी रंगभूमीवरील संपुष्टात आलेल्या राजकीय नाट्यावर भाष्य केले. स्वातंत्र्यपूर्वकाळात रंगभूमीवर आलेल्या राजकीय नाटकांवर वझे यांनी प्रकाश टाकला. स्वातंत्र्यपूर्वकाळात नाटक एकाच वेळी अनेक प्रेक्षकांना चेतवते याची जाणीव नाटककारांना होती. सुरूवातीच्या काळात नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांची  किचकवध आणि  भाऊबंदकी ही नाटके गाजली. लॉर्ड कर्झन हा ब्रिटीश अधिकारी बंगालच्या फाळणीला जबाबदार होता. त्याला उददेशून हे नाटक लिहिले त्यावर ब्रिटीशांनी बंदी आणली होती.  भाऊबंदकीमध्ये रामशास्त्री राज्यकर्ते पेशव्यांना देहांत प्रायश्चित सुचवतात. ब्रिटीश राज्यकतर््यांना देहांत प्रायश्चितच हवे असा संदेश दिला गेला. हळूहळू भारताचे राजकारण बदलले. गांधींनी सूत्रे हाती घेतली. खाडिलकरांनी नव्या काळाला अनुसरून सत्वपरीक्षा हे नाटक लिहिले. बदलत्या राजकारणाची दखल त्यांनी घेतली. वीर वामनराव जोशी यांनी  रणदुमदुमी लिहिलेले नाटक प्रसिद्ध झाले. त्यातील  परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला असूनही हाच मालक घरचा म्हणती चोर त्याला असे ब्रिटीशांना उददेशून म्हटले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी  ह्यसन्यस्त खडगह्ण आणि  उत्तरक्रिया ही नाटके लिहिली. लेखणी मोडा आणि बंदूका हातात घ्या हे तत्व त्यांनी मांडले. माधवराव जोशी यांचे म्युनसिपाल्टी हे नाटक लिहिले. महापालिका, नगरपालिका अस्ताव्यस्ततेची आठवण होते, आजही हे नाटक कालसुसंगत आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण शब्दबद्ध केले आहे. आचार्य अत्रे यांनी  मी उभा आहे आणि  मी मंत्री झालो ही नाटके लिहिली. वि. वा शिरवाडकर यांनी  मुख्यमंत्री हे गंभीर स्वरूपाचे नाटक लिहिल्याने ते फारसे चालले नाही. सहा ते सात नाटककरांनी रंगभूमी गाजवली. मात्र स्वातंत्र्यानंतर चित्रे बदलले. राजकारण मागे पडले आणि समाजकारण आले. माणसाचा शोध सुरू झाला. गिधाडे , सखाराम बाईंडरनाटके लिहिली. गो.पु देशपांडे यांनी नाटकात राजकारणाचा थेट संबंध आणला नाही. पण राजकीय तत्वाची मांडणी केली. स्वातंत्र्यानंतर राजकीय रंगभूमी पुन्हा सुरू करण्याचे श्रेय करण्याचे श्रेय गो.पु यांना जाते. महात्मा गांधी यांच्यावर चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटक आणले. पण राजकारणाशी थेट संबंध नव्हता. 

कालपरत्वे आधुनिक मराठी रंगभूमीवर राजकीय नाटक मागे पडले. खासगी सेन्सॉर बोर्ड स्थापन झाले. नथुराम गोडसे बोलतोय हे गांधीच्या तत्वाज्ञानाशी चिरफाड करणारे नाटक सेना आणि कॉंग्रेसने चालू दिले नाही. म्हणून राजकारणावर नाटक लिहायला नाटककार घाबरत आहेत. नाटक लिहिले तरी ते रंगमंचावर येणार नाही आले तरी लोक ते बंद पाडतील. पूर्वीच्या काळात लोक विरोध करीत होते  खळखट्याक सारख वातावरण नव्हते.मात्र, सध्या परिस्थिती बदलली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारNote Banनोटाबंदी