पोदार स्कूलमध्ये वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST2021-06-10T04:08:53+5:302021-06-10T04:08:53+5:30

पर्यावरण दिनानिमित्त प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव यांच्या हस्ते वृक्षपूजा करण्यात आली व सर्व शिक्षकांच्या उपस्थित काेरोना ...

Plantation at Podar School | पोदार स्कूलमध्ये वृक्षारोपण

पोदार स्कूलमध्ये वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव यांच्या हस्ते वृक्षपूजा करण्यात आली व सर्व शिक्षकांच्या उपस्थित काेरोना नियम पाळत प्रशाला परिसरामध्ये वृक्ष लागवड केली.

पर्यावरण दिनानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरात झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश देऊन विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडाचे, संगोपन स्वतःच करून त्यास वाढवू आणि प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणावर झाडे लावू अशी प्रतिज्ञा केली.

यावेळी प्राचार्य विशाल जाधव म्हणाले की, प्रत्येकाने निसर्गाचे संवर्धन व संगोपन केले पाहिजे आणि निसर्ग आपणास बऱ्याच गोष्टी हा नियमित देत असतो. म्हणून आपणही प्रत्येकाने पर्यावरणाची हानी पाहता जर निसर्ग वाचवायचा असेल तर याचे रक्षण करावे व त्यासाठी प्रत्येकाने मोठ्या प्रमाणावर झाडे लावावीत, असे प्रतिपादन केले.

Web Title: Plantation at Podar School