माजी विद्यार्थी संघाकडून वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:11 IST2021-07-31T04:11:12+5:302021-07-31T04:11:12+5:30

वाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अ‍ॅड. राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाकडून ...

Plantation from the Alumni Association | माजी विद्यार्थी संघाकडून वृक्षारोपण

माजी विद्यार्थी संघाकडून वृक्षारोपण

वाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अ‍ॅड. राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाकडून आंबा, नारळ, फणस, अशोक, पेरू, चिंच, गुलाब व फुलझाडे उपलब्ध करून देण्यात आली. शालेय परिसरात माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या फीसाठी 20450 रुपयांचा चेक देण्यात आला.

माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी प्रास्ताविक केले. इम्रान मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच रघुनाथ लांडगे,ग्रामपंचायत सदस्य कुमुदिनी केदारी, मनोहर जाधव, सुनील आढाव, विद्या ढोबळे, रेखा आढाव, रामचंद्र साबळे, कल्पना शिंदे, शोभा जाधव, श्रीपती कहाणे, सायली केदारी, दीपक कहाणे, उमेश कुंभार, भानुदास क्षीरसागर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक सतीश हाके, शशिकांत पावडे, दिलीप बच्चे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Plantation from the Alumni Association