शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 12:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत आयोजित पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

पुणे: भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. ग्रामीण भागात मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येतील, असे प्रतिपादन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. दरम्यान अचूक मतदार यादी करण्यासाठी छायाचित्र नसलेले व दुबार मतदारांची नावे सर्व प्रक्रिया पूर्ण करून यादीतून डिलिट करा, अशा स्पष्ट सूचना देखील दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत आयोजित पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मिलींद शंभरकर, उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, साताराचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पुण्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, सोलापूरच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, साताराच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे  आदी उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसभेचे नियोजन करावे. नवमतदार आणि गावात नुकतेच विवाह होऊन आलेल्या महिलांची शिबिराच्या माध्यमातून मतदार यादीत नोंदणी करण्यात यावी. मतदार यादीत दिव्यांग मतदारांची नोंद घेण्यात यावी. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 13 व 14 नोव्हेंबर तसेच  27 आणि 28 नोव्हेंबर रोजी सर्व मतदान केंद्र, मोठी महाविद्यालये, औद्यागिक क्षेत्रात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून मोहिमेस व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी.

मतदार यादीत आपले नाव तपासण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात यावे. राजकीय पक्षांची बैठक, लोकशाही गप्पा आदी उपक्रम राबवून संपूर्ण प्रकीयेची माहिती देण्यात यावी. 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी अधिकाधिक निर्दोष राहील याची दक्षता घ्यावी. शहरी भागातील मतदाराचे नाव निवासस्थानाजवळ असलेल्या मतदान केंद्राच्या यादीत असेल यासाठी विशेष प्रयत्न करावे. विशेष मोहिमेदरम्यान आलेले दावे व हरकतींबाबत त्वरीत प्रक्रीया सुरू करावी. मतदान केंद्र स्तरावरील चांगल्या उपक्रमांची देवाणघेवाण करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.पुण्याच्या जिल्हाका-यांचे कौतुक मतदार यादी ‍निर्दोष करण्याबाबत वर्षभरात पुणे जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि या प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :Puneपुणेsatara-acसाताराSolapurसोलापूर