शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

...अाणि अाळंदीतून झेपावली विमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 8:54 PM

एमअायटी विश्वशांती गुरुकुलातर्फे एराेमाॅडेलिंग शाे चे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी सादर करण्यात आलेल्या कसरतींना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

पुणे : ‘स्वस्तिक’नावाच्या ग्लायडर ने आकाशात प्रथम झेप घेतली अाणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बलसा लाकडापासून तयार केलेले ‘जेनी’विमान व दोन पंखांचे ‘बायप्लेन’,‘स्टींगरे’या विमानाने  केलेल्या व्हर्टिकल  रोल मध्ये एअरफोर्स सारख्या कसरतीनांही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.  त्यानंतर थर्माकोलपासून विकसित केलेली ‘उडती तबकडी’ आकाशात झेपावली.  ‘हेलिकॉप्टर’ ने अनेक पलट्या व कोलांटयाउडया घेवून आकाशात बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांच्या डाेळ्यांचे पारणे फेडले,निमित्त हाेते  केळगांव, अाळंदी येथे विश्वशांती गुरुकुल अायाेजित एराेमाॅडेलिंग शाे चे. यावेळी एराेमाॅडेलर सदानंद काळे,एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड,  संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, आळंदी येथील गुरुकुलाचे प्राचार्य अशोक जैन आदी उपस्थित हाेते.  

      या प्रसंगी बाेलताना सदानंद काळे म्हणाले,  बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, तांत्रिक कौशल्य, एकाग्रता, अचूक व तत्काळ निर्णय क्षमता, चिकाटी, साहस आणि संयम या सारखे गुण एरोमॉडलिंगच्या छंदामुळे मुलांमध्ये  वृद्धिंगत होतात.  भविष्यात जर देशाला चांगले पायलट हवे असतील तर शासनाने एरोमॉडेलिंगला मदत व प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. तसेच वर्तमानकाळात हवाई विज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. शासकीय व खाजगी क्षेत्रात तरूण उत्तम प्रकारे करियर करु शकतात. प्राथमिक शिक्षणापासून विमानाच्या सहवासात असणार्‍यांना भविष्यात एरो इंजिनियर व पायलट होण्यास मदत होईल. अमेरिका, जर्मनी, जपान, फ्रान्स व रशिया इ. देशात विमान बनविणे व उडविणे हा छंद  जोपासला जातो. तेथे एरोमॉडेलिंगच्या स्पर्धा होतात. त्यात लहानांपासून सर्व वयोगटातील लोक सहभागी होतात. तसेच, एरोमॉडेलर्सना स्टेडियम उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज आहे. याच्या प्रसारासाठी प्रत्येक शहरात शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एरोमॉडेलिंग क्लब स्थापन व्हावेत असेही ते यावेळी म्हणाले.     प्रा. राहुल कराड म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये विमान उड्डाणाची आवड निर्माण व्हावी व त्यातील विज्ञान समजून दयावे, यासाठी या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्‍वशांती गुरुकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे परिपूर्ण शिक्षण देण्यात येणार आहे.  येथून नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करणारे विद्यार्थी बाहेर पडतील.    साधारणपेण मोठ्या शहरांमध्ये एरोमॉडेलिंग शो चे स्पेशल स्टंट पहावयास मिळतात, परंतू या वेळेस आळंदी स्थित हनुमंतवाडी, केळगांव येथील गुरुकुलात आयोजित एरोमॉडेलिंग शोमध्ये छोट्या हवाई जहाज (एरोमॉडेल्स) च्या कसरती पहावयास मिळाले. येथे २ फूटाचे छोटे एरोमॉडेल्सपासून १० फूटाचे एरोमॉडेल्सने चित्तथराक कसरती सादर केले. विशेष म्हणजे येथे ३० सीसी पासून १५० सीसी पर्यंतचे एरोमॉडेल्सचा सहभाग झाला होता. त्यामध्ये जेट हवाई जहाज पासून कित्येक मॉडेल्सचे हवाई जहाजाचे चित्तथराक कसरती पहावयास मिळाले. हे सर्व हवाई जहाज रेडिओ कंट्रोलच्या माध्यमातून उडविण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेmitएमआयटीAlandiआळंदी