शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

'ती' भेट आता होणे नाही...' लेकाच्या भेटीसाठी निघालेल्या आई - वडिलांचा विमान अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:00 IST

- लंडनला असणाऱ्या मुलाची भेट घेण्यासाठी पहिल्यांदाच विमानवारी करणाऱ्या मूळचे ( ता.सांगोला,जि.सोलापूर) मधील दांपत्याचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे.

इंदापूर :गुजरातमधीलअहमदाबादमध्ये गुरुवारी एक मोठा विमानअपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचाअपघात झाला.अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमानाने उड्डाण केल्या-केल्या लगेचच मेघानीनगरच्या रहिवासी परिसरात हे विमान कोसळलं. विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं. वृत्तसंस्था एएनआयनुसार, विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते.

या  विमान अपघातात विमानामधील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. या अपघातात एका दांपत्याचा मृत्यू झाला आहे. लंडनला असणाऱ्या मुलाची भेट घेण्यासाठी पहिल्यांदाच विमानवारी करणाऱ्या मूळचे ( ता.सांगोला,जि.सोलापूर) मधील दांपत्याचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे.अधिकच्या माहितीनुसार, महादेव तुकाराम पवार,आशा महादेव पवार असे या दांपत्याचे नाव आहे. ही दुर्घटना झाल्याचे समजल्यानंतर पुण्याहून अहमदाबादला जाण्यासाठी त्यांच्या मूळगावाहून पुण्याला निघालेले महादेव पवार यांचा पुतण्या सचिन पवार, पुतणी उषा चव्हाण व त्यांचे नातेवाईक काही काळ इंदापूरात थांबले होते. त्यांनी याबाबत माध्यमांशी बोलतांना सविस्तर माहिती दिली.माध्यमांशी बोलतांना सचिन पवार म्हणाले,'महादेव पवार कामानिमित्त गुजरातमधील नडीयाद येथे रहात होते. त्यांचा मुलगा व आपला चुलतभाऊ शैलेश हा सात आठ वर्षांपासून लंडनमध्ये स्थायी असून तेथेच ते बेकरीचा व्यवसाय करत आहे. लेकाला भेटण्यासाठी हे दोघेजण पहिल्यांदाच विमानाने लंडनला निघाले होते.परंतू त्यांच्या नशीबात मुलाची भेट नव्हती. शैलेशचीही इच्छा होती की आई वडिलांनी लंडनला यायला हवे.पण ते होवू शकले नाही. महादेव पवार दर महिना दोन महिन्यातून हतीद या त्यांच्या मूळ गावी येत असत. आता ती भेट ही होवू शकणार नाही, हे सांगताना सचिन पवार यांना गहिवरुन आले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAccidentअपघात