शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

पुण्याच्या '' कारभारी '' पदासाठीच बापट यांचा गनिमी कावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 07:00 IST

'खासदारा' ने शहराचे नेतृत्व करायचे अशी पुणे शहराची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.

ठळक मुद्देमंत्रिमंडळातून पुणे गायब: पक्षातील विरोधकांना गारद करण्याचा प्रयत्न

पुणे : भारतीय जनता पाटीर्ला पुणेकरांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत भरभरून मते दिली. तरीही राज्य मंत्रिमंडळात पुण्याला उणे ठेवल्याबद्दल राजकीय टीकाटिप्पणी होत आहे. मात्र, खासदार गिरीश बापट यांनीच पुण्याचे सर्वेसर्वा होण्यासाठी म्हणून राजकीय वजन वापरून ही व्यवस्था केली असल्याचे बोलले जात आहे. दुसरे सत्ताकेंद्र नको या हेतूने त्यांनी हा गनिमी कावा केला असल्याची चर्चा आहे.खासदाराने शहराचे नेतृत्व करायचे अशी पुणे शहराची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. विठ्ठलराव गाडगीळ केंद्रात मंत्री होते त्यावेळी त्यांनीही पुणे महापालिकेतील आपला गट जपला होता. त्यांच्यानंतर सुरेश कलमाडी यांनी तर महापालिका व शहरातील काँग्रेस पक्षही आपल्या कवेत घेतला व ते पुण्याचे सर्वेसर्वा झाले. तीच गोष्ट कलमाडी यांचा राजकीय अस्त झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महापालिकेच्या माध्यमातून पुण्यावर आपले राजकीय वर्चस्व निर्माण केले. तोच प्रकार आता बापट यांनाही करायचा असून त्यामुळेच त्यांनी राज्यातील कॅबिनेट मंत्रीपद सोडून खासदार होण्याची मनिषा धरली असे राजकीय वतुर्ळात सांगितले जाते.मागच्याच लोकसभा निवडणूकीत त्यांना खासदार व्हायचे होते, मात्र त्यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले, पुण्यातील सर्व जागा ताब्यात आल्या, त्याचा पुरेपूर वापर करत बापट यांनी कॅबिनेट मंत्री पद घेतले, मात्र तरीही खासदारकी त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळेच संधी मिळताच त्यांना नाही, नाही म्हणत खासदारकीच्या उमदेवारासाठी दावा केला व ती पदरातही पाडून घेतली. त्यासाठी मंत्री पदाचा त्यात करायलाही त्यांना मागेपुढे पाहिले नाही. खासदारकी मिळताच त्यांनी आता त्यांचे मनातले राजकारण करायला सुरूवात केली.राज्य मंत्रिमंडळात पुण्याला प्रतिनिधीत्व मिळणे गरजेचे होते. आमदार माधुरी मिसाळ यांनी त्यासाठी मोचेर्बांधणीही केली होती, मात्र त्यांचे मनसुबे मनातच राहिले. बापट यांनीच कोणालाही अनुभव नाही, चुकीचे काही केले जाईल, मतदारांमध्ये त्यातून चुकीचा संदेश पोहचेल असे सांगत मुख्यमंत्र्यांना पुण्याविषयी काळजी करू नका, मी आहे असे सुचवले असल्याची माहिती मिळाली. पक्षातीलच काही सुत्रांनी सांगितले की बापट यांनाच शहरात नवे सत्ताकेंद्र निर्माण होऊ द्यायचे नव्हते. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे राज्यमंत्री पदही त्यांनाच नको होते. त्यामुळे त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा आधार घेत त्यांनी कांबळे यांच्यावरही संक्रात आणली.खासदार होताच त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्या स्वतंत्र बैठका घ्यायला सुरूवात केली. पुण्याशी संबधित विविध विषयांच्या चर्चा केल्या. त्याची प्रसिद्धी होईल याची काळजी घेतली. त्यांच्या या सर्व हालचाली त्यांना पुण्याचे कारभारी व्हायचे आहे यालाच पुष्टी देतात. पक्षाचे सहयोगी असलेले खासदार संजय काकडे यांना तर त्यांनी सुरूवातीपासूनच पुण्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. पालिका निवडणूकीपासून त्यांनी खासदार काकडे यांच्याबाबत खासगी तसेच जाहीर कार्यक्रमांमधूनही टीका टिप्पणी कायम ठेवली. लोकसभा निवडणूकीतील त्यांच्या पक्षविरोधी हालचालींची माहितीही मुख्यमंत्र्यांना बापट यांच्याकडूनच पुरवली जात होती असे पक्षातील काहीजणांचे म्हणणे आहे. काकडे यांना पुण्यात स्थैर्य लाभू द्यायचे नाही असाच प्रयत्न बापट कायम करत असतात. 

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा