शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत युवती सेना प्रमुख प्रतीक्षा घुलेंच्या सांगण्यावरून महिलेला मारहाण; जेसीबीच्या साहाय्याने घरही पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 20:40 IST

युवती सेनेच्या पिंपरी विधानसभा प्रमुख पदी असलेल्या महिलेच्या सांगण्यावरून घर पाडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद

पिंपरी : महिलेला मारहाण करून घराबाहेर काढून जेसीबीच्या साह्याने घर पाडले. तसेच महिलेच्या मुलाला देखील विटा फेकून मारत जखमी केले. युवती सेनेच्या पिंपरी विधानसभा प्रमुख पदी असलेल्या महिलेच्या सांगण्यावरून घर पाडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रामनगर, बोपखेल येथे शनिवारी (दि. ८) दुपारी ही घटना घडली.    

अनिता नंदकिशोर बिलोरीये (वय ५०, रा. रामनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित भिवाल, नीलेश भिवाल, विवेक लवेरा, सनी भिवाल, प्रियंका भिवाल, सोनू लवेरा, निकिता पिल्ले, प्रतीक्षा घुले (रा. बोपखेल) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी सनी भिवाल याला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी आरोपी घरात आले. तुमची वडिलोपार्जित जमीन डेव्हलपमेंटला दिली आहे. त्याबाबतच्या पॉवर ऑफ ॲटर्नीवर गुपचूप सही कर. नाहीतर तुला जाळून टाकू, अशी आरोपींनी धमकी दिली. फिर्यादीने सही करण्यास नकार दिला. किचनमधील गॅस शेगडी फिर्यादीच्या अंगावर फेकून मारून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीला बळजबरीने घराच्या बाहेर काढले. आरोपींनी जेसीबी मशीनने फिर्यादीच्या घराच्या भिंती व संपूर्ण घर पाडले. फिर्यादीचा मुलगा अक्षय याने जेसीबी मशीन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्याला विटा फेकून मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

‘मला बदनाम करण्याचा प्रयत्न’

घर पाडले त्यावेळी प्रतीक्षा घुले तिथे होत्या. त्यांच्या सांगण्यावरून अन्य आरोपींनी हे भांडण करून घर पाडले, असे फिर्यादीत नमूद आहे. प्रतीक्षा घुले या युवती सेनेच्या पिंपरी विधानसभा प्रमुख आहेत. यातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असे प्रतीक्षा घुले यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस