शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी, संभाजीनगरचा तलाव हंगाम संपला तरी अपूर्णच!

By admin | Updated: May 27, 2014 07:00 IST

पिंपरीगाव व संभाजीनगर, चिंचवड येथे बांधण्यात येणार्‍या जलतरण तलाव उन्हाळ्याचा हंगाम संपत आला तरी अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे

पिंपरी : पिंपरीगाव व संभाजीनगर, चिंचवड येथे बांधण्यात येणार्‍या जलतरण तलाव उन्हाळ्याचा हंगाम संपत आला तरी अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. करोडोंचा खर्च करूनही ही स्थिती असल्याने जलतरण शौकिनांमध्ये नाराजीचा सूर आहे. महापालिकेचे शहरात नेहरुनगर, मोहननगर, केशवनगर, प्राधिकरण, यनुनानगर, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, भोसरी, थेरगाव या ठिकाणी असे एकूण १० सार्वजनिक तलाव आहेत. पिंपरीगाव व संभाजीनगर, चिंचवड येथे नव्याने दोन तलाव बांधण्यात येत आहेत. दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे काम संथ गतीने सुरू आहे. सध्या ते अर्धवट स्थितीत पडून आहे. पिंपरीगावात पवना नदीकाठी तलाव बांधण्याचे काम बंद पडले आहे. तलावाकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. नदीच्या कडेने असलेला रस्ता बंद केला आहे. उद्यानाच्या बाजूने जाण्यास अरुंद व अपुरा रस्ता आहे. नव्या व्यक्तीस खूप शोध घेतल्यानंतर या ठिकाणी जाता येते. केवळ तलावाचा २५ बाय १६ मीटरचा हौद बांधला आहे. तळाची खोली साडेतीन ते सहा फूट आहे. मात्र, परिसरात सीमा भिंतीशिवाय काहीच नाही. राडारोडा पडला असून, काम बंद असल्याने झाडेझुडपे उगवले आहे. टवाळ तरुण रात्रीच्या वेळी या ठिकाणी मद्यपान आणि अवैध धंद्यासाठी याचा वापर करत आहेत. परिसरात दारूच्या बाटल्यांचा ढीग पडला आहे. काम बंदस्थितीत आहे. संभाजीनगर येथील शिव-शाहू- संभाजी उद्यानामागील (बर्ड व्हॅली) असलेल्या उद्यानाजवळ तलावाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. तलावाचा हौद तसेच, शॉवर रुम व कपडे बदल्याचे रुम अर्धवट स्थितीत आहेत. काम सुरू झाल्यापासून बांधकाम कासव गतीने सुरू आहे. सध्या ते बंद स्थितीत आहे. दोन्ही तलावास सुमारे अडीच कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या दुर्लक्षामुळे काम बंद पडले आहे. उन्हाळ्याचा हंगामात हे दोन्ही तलाव खुले होणार होते. मात्र, हंगाम संपत आला तरी काम अपूर्ण आहे. त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. येथील नागरिकांना नाईलाजास्तव दूर अंतरावरील तलावावर पोहण्यास जावे लागत आहे.(प्रतिनिधी)