शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी पोलिसांची मान शरमेने खाली गेली, जेव्हा दारू विक्रेत्यांनी "खाकी वर्दी" ची कॉलर धरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 12:56 IST

दारू विक्री करणाऱ्यांनी झटापट करून पकडली पोलिसाची कॉलर

ठळक मुद्देराहत्या घरातून विदेशी दारू व बिअरच्या ९७ हजार १४५ रुपये किमतीच्या ५१८ बाटल्या जप्त

पिंपरी: समाजाचे रक्षक असणाऱ्या पोलीस बांधवांची मान शरमेने खाली गेली आहे. घरातच दारूची विक्री करत असलेल्यांनी पोलिसांचीच कॉलर पकडून दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार निगडी येथे घडला आहे. घरात विदेशी दारू बिअरच्या बाटल्या बाळगून त्याची विक्री करीत असलेल्यांना पोलिसांनी पकडले. यावेळी कारवाई करू नये म्हणून पोलिसांशी झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. याप्रकरणी मुळचे नेपाळ येथील असलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

करण भरत सोनार (वय २३), अर्जुन भरत सोनार (वय २०), दीपेश भरत सोनार (वय १९), भरत अमर सोनार (वय ४५), मनीषा भरत सोनार (वय २२), गीता भरत सोनार (वय ४०, सर्व रा. प्राधिकरण निगडी, मुळगाव मोगलसेन, जि. आच्छाम, नेपाळ), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार सतीश ढोले यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे ‌ 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संगनमत करून राहत्या घरामध्ये विदेशी दारू व बिअरच्या ९७ हजार १४५ रुपये किमतीच्या ५१८ बाटल्या जवळ बाळगून त्याची लोकांना विक्री करत होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपींना पकडले. पोलिसांनी कारवाई करू नये म्हणून आरोपी करण सोनार याने सतीश ढोले यांची कॉलर पकडली. इतर आरोपींनी शिवीगाळ तसेच दमदाटी केली. कारवाई करू नये म्हणून आरडाओरड व गोंधळ करुन पोलिसांशी झटापट केली. ‌सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnigdiनिगडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक