शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

पिंपरी महापालिकेने उचलले ' हे ' पाऊल म्हणून आठवड्यात कोरोनाचा नव्याने एकही रुग्ण नाही..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 09:18 IST

आजपर्यंत आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे..

ठळक मुद्दे कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर झालेले नसून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहनमहापालिकेच्या वतीने परदेशातून आलेल्या प्रवाशी आणि त्यांच्या कुटुंबावर ठेवले लक्ष १३९४ प्रवाशांना केले होम क्वारंटाईन

पिंपरी :  कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या प्रभावी उपाययोजना महापालिकेने केल्या असून शहरात आलेल्या १३९४ प्रवाशांना होम क्वारंटाईन केले आहे. डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारी अशा १२० टीम त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे आठवडाभरात एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळेला नाही. कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर झालेले नसून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने केले आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष तयार केला आहे. तसेच रूग्णांची संख्या वाढली तर पिंपरीतील जिजामाता रूग्णालयात शंभर बेड आणि नेत्ररूग्णालयातही बेडची व्यवस्था केली आहे. तसेच वैद्यकीय विभागाच्या वतीने डॉक्टर आणि परिचारिक अशी व्यवस्था सज्ज केली आहे. स्वाईन फ्लूच्या कालखंडात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कोरोनाचा सामना करीत आहेत.

परदेशातील नागरिकांवर नजरमहापालिकेच्या वतीने परदेशातून आलेल्या प्रवाशी आणि त्यांच्या कुटुंबावर लक्ष ठेवले आहे. त्यासाठी सुमारे १२४ टीम तयार केल्या आहेत. आलेले प्रवाशी त्यांची ट्रॅॅव्हल हिस्ट्री तपासून त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. होम क्वारंटाईनमध्ये असणाºया नागरिकांवर प्रशासनाचे बारिक लक्ष आहे. सध्या १३९४ प्रवाशांना होम क्वारंटाईन केले आहे.

तपासणीत १७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह  पुण्यातील एनआयव्हीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आजपर्यंत एकूण २०१ व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी १८६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर बारापैकी तीन जणांवर उपचार करून सोडून देण्यात आल्याने रूग्णालयात सध्या नऊ जण उपचार घेत आहेत. काल दाखल केलेल्या १७ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  

पंधरा जणांचे अहवाल प्रतिक्षेतमहापालिकेच्या रूग्णालयात पंधरा जणांना दाखल केले असून त््यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीमध्ये तपासणी करण्यासाठी पाठविले आहेत. रूग्णालया सध्या चोवीस जण अ?ॅडमीट आहेत, मात्र, त्यांची  प्रकृती स्थिर आहे. तसेच १४ दिवसांचा होम क्वारंटाईन पूर्ण करणाºयांची संख्या १९७ आहे. तसेच शनिवारी १७ जणांना डिस्चार्ज केले आहे. महापालिकेचे प्रशासन, वैद्यकीय आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन हे एकजूटीने काम करीत असल्याने आठवडाभरात एकही नवीन रूग्ण आढळलेला नाही.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ह्यह्यपिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष तयार केला आहे. आणखी दोन रुग्णालयात आयसोलेशन कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लॉक डाऊनच्या कालखंडात नागरिकांनी घराबाहेर पडू नये. स्वतची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. नियमितपणे हँडवॉश करावा. सोशल डिस्टसिंग पाळायला हवे. हस्तांदोलन टाळावे, सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत. नागरिकांनी आपल्या, कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.ह्णह्ण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर