शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पिंपरी महापालिका आयुक्तांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह; आयुक्त निगेटिव्ह असल्याने 'ऑनफिल्ड'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 5:31 PM

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कुटुंबातील दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, आयुक्त निगेटिव्ह आहेत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कुटुंबातील दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, आयुक्त निगेटिव्ह आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह असतानाही आयुक्त कर्तव्यावर आहेत. शहरातील कोरोना रुणांवर उपाययोजना करण्यासाठी मॅरेथॉन बैठका घेत आहेत. उपाययोजना करीत आहेत. महापालिका भवनात दोन डोस पूर्ण झालेले असणाऱ्यांनाच परवानगी दिली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांवर गेली आहे. मोरवाडीतून टेल्को चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अविष्कार हे आयुक्तांचे निवासस्थान आहे. मागील आठवडयात आयुक्तांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आयुक्तांनी महापालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून तपासणी करून घेतली. त्यात आयुक्तांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह सदस्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होत आला आहे.  आयुक्त ऑनफिल्ड

गेल्या आठवडयात कोरोनाचा आलेख वाढत आहे. शहरात वाढता कोरोनाचा आलेख पाहता आयुक्तांच्या वतीने आरोग्य, वैद्यकीय विविध विभागाच्या बैठका सुरू आहेत. उपाययोजनासाठी बैठका सुरू केल्या आहेत. उपाययोजनांसाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू

''महापालिका परिसरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता, सर्वांनी काळजी घ्यावी. लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. ज्या नागरिकांचे लसीकरण झाले नाही. अशांनी लसीकरण करून घ्यावे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन केले जाईल असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.'' 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाCorona vaccineकोरोनाची लसcommissionerआयुक्त