शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Crime : भर दिवसा खून करून रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन गाठले पोलिस ठाणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 21:06 IST

पिंपरी : आर्थिक नुकसानीचा राग मनात धरून भर दुपारी उद्योजकाने कुऱ्हाडीने वार करून एकाचा खून केला. त्यानंतर रक्ताने माखलेली ...

पिंपरी : आर्थिक नुकसानीचा राग मनात धरून भर दुपारी उद्योजकाने कुऱ्हाडीने वार करून एकाचा खून केला. त्यानंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड हातात घेऊन त्याने पिंपरी पोलिस ठाणे गाठले. मी खून केला आहे, असे त्याने पाेलिसांना सांगितले. पिंपरी कॅम्पातील गेलार्ड चौकात मंगळवारी (दि. २६) दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.महेश सुंदरदास मोटवाणी (४६, रा. गेलार्ड चौक, पिंपरी), असे खून झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. राम गोपीचंद मनवानी (४१, रा. गेलार्ड चौक, पिंपरी), असे संशयिताचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मनवानी आणि महेश मोटवाणी या दोघांचेही कुटुंब पिंपरी कॅम्पातील गेलार्ड चौकात एकमेकांच्या शेजारी राहतात. राम मनवानी याची ॲल्युमिनियम फाॅईलची फॅक्टरी होती. त्या फॅक्टरीमध्ये महेश मोटवाणी हे कामाला होते. महेश यांच्यामुळे फॅक्टरीमध्ये आर्थिक नुकसान होऊन त्यांच्यामुळेच मी दिवाळखोर झालो, असे राम मनवानी याचे म्हणणे होते. महेश यांच्यामुळेच माझे आर्थिक नुकसान झाले, असा त्याचा आरोप होता. त्यातून महेश आणि राम या दोघांमध्ये वादाचे प्रकार घडले.

दरम्यान, महेश हे एका ऑनलाइन कंपनीसाठी ‘फूड डिलिव्हरी बाॅय’ म्हणून काम करत होते. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास फूड डिलिव्हरीच्या कामासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी राम मनवानी हा हातात कुऱ्हाड घेऊन थांबला होता. महेश हे घराबाहेर पडताच राम याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात महेश हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. 

महेश यांच्यावर वार केल्यानंतर राम हा रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. मी खून करून आलोय, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिस अवाक झाले. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. 

दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेश मोटवाणी यांना काही नागरिकांनी पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान महेश यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड