शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

शासनाची कोट्यवधींची रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी आमदार सुनील शेळकेंवर कारवाई होणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:40 IST

या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी व्हावी,अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. आता शेळकेंवर कारवाई होणार का,असा सवाल तालुक्यातून विचारला जात आहे.

पिंपरी : मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहेत.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर दगड आणि खाणींच्या उत्खननातून शासनाची कोट्यवधींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी व्हावी,अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. आता शेळकेंवर कारवाई होणार का,असा सवाल तालुक्यातून विचारला जात आहे.

मावळ तालुक्यात दगड आणि खाणींचे उत्खनन करण्याचे प्रकार सध्या जोरात सुरू आहेत. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, शासनाची परवानगी न घेता शेळके यांनी दगड आणि खाणींचे उत्खनन केले. मात्र, त्याची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही.आंबळे गावातील खाण जमिनींवर शेळके यांनी उत्खनन केले असून, त्या जमिनीत सुमारे १०० फूट खोल खड्डे पडले आहेत. उद्योगासाठी अयोग्य असतानाही एमआयडीसीने ही खाण जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केली. त्या बदल्यात शेळकेंना २९ हेक्टर जमीन पर्यायी क्षेत्र म्हणून देण्यात आली. मात्र, ते इतर शेतकऱ्यांना मिळाले नाही. प्रतिएकर ७३ लाखांची खाण जमीन घेऊन २.५ कोटी प्रतिएकर किमतीची जमीन देण्याचा प्रस्ताव एमआयडीसीने दिला. या संपूर्ण प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी न झाल्यास हे प्रकरण दडपले जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. 

जानेवारीत वाहनांवर कारवाईवेळी अडसर;रंगले होते नाट्यदि. २२ जानेवारीस किवळे ते देहूरोडदरम्यान गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या १८ वाहनांवर पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयाने कारवाई केली होती. त्यापैकी ११ वाहने जप्त करण्यात आली, तर बाकीची सोडून देण्यात आली.याबाबत गुन्हा नोंदवण्यासाठी महसूलचे अधिकारी देहूरोड पोलिस ठाण्यात गेले. मात्र, राजकीय दबाब आल्याने पोलिसांनी एफआरआय दाखल करून घेतला नाही. जप्त केलेली वाहनेही ठेवून घेण्यास नकार दिला होता.

बड्या नेत्याने धारेवर धरल्याने लपवाछपवीकारवाईनंतर दुसऱ्या दिवशी या वाहनांचे मालक असलेले कार्यकर्ते तहसील कार्यालयात तळ ठोकून होते. प्रशासनाने त्यांना न जुमानल्याने बडा नेता तेथे दाखल झाला. त्याने अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर प्रशासनाने कारवाई केलेल्या वाहनांचे क्रमांक आणि दंडाच्या रकमेची माहिती दिली नाही. वाहने जप्त केलेल्या जागेबाबतही चुकीची माहिती दिली होती. या प्रकरणात आमदार सुनील शेळके यांच्याकडे संशयाची सुई वळली होती. 

पुरावे दिल्यावरच खुलासाकोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना खासदार राऊत यांनी आरोप केले आहेत. मला कोणती नोटीस आली असेल अथवा चौकशी सुरू असेल तर त्यांनी त्याचे लेखी पुरावे द्यावेत. तोपर्यंत मी याबाबत कोणताही खुलासा देणार नाही. - सुनील शेळके,आमदार,मावळ

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस