शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अजबच..! मुळा नदी सुधार प्रकल्प सुरू झाला आणि आता सूचना-हरकतींचा फार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 09:53 IST

- सांगवी येथे बोलावले होते महाविद्यालयातील मुलांना : पर्यावरणवाद्यांनी प्रशासनास घेतले फैलावर

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवर असणाऱ्या मुळा नदीवर सुधार प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पास पर्यावरणवादी संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर सूचना आणि हरकतींचा फार्स सुरू असल्याचे पर्यावरणवादी संघटना आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी सांगवीतील बैठकीत उघड केले. त्यांनी प्रशासनास फैलावर घेतले.

महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पातील चुकीच्या गोष्टींना शहरातील पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर महापालिकेच्या वतीने सूचना आणि हरकतींचा फार्स सुरू केला आहे, याविषयीची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी हा प्रकार पर्यावरणवादी संघटनांनी उघड केला.

सांगवी येथील प्रकल्पाच्या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयामध्ये दुपारी परिसरातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. प्रकल्पाचे सादरीकरण करून त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्याचे नियोजन होते. याबाबतची माहिती पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर कार्यकर्ते धडकले. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले. प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता अर्ज कशासाठी, असे म्हणून धारेवर धरले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉमनिक लोबो, राष्ट्रवादीचे सागर चिंचवडे, बाबा भोईर, सूरज भोईर, मनसेचे राजू सावळे उपस्थित होते. 

कशाला बोलावले, हेही सांगता आले नाहीनिविदा निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. आता आपण सूचना-हरकती घेऊन काय करणार, असा प्रश्न केला. त्यावेळी प्रशासनाने आम्ही विविध स्तरांतील नागरिकांच्या सूचना-हरकती घेऊन त्यांचा समावेश करून काही बदल करणार असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कशाला बोलावले, हेही सांगता आले नाही. मात्र, त्यांच्याकडून काही सूचना आणि हरकतींचे अर्ज भरून घेण्यात आले.

नदी सुधार प्रकल्प राबवताना पर्यावरणवादी संघटनांशी चर्चा करून हा प्रकल्प कशा पद्धतीने राबवायला हवा, त्याचबरोबर नदीकाठची जैवविविधता कशी कायम राहील, याविषयी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाच्या वतीने प्रकल्प दामटला जात आहे. आम्ही अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.  - डॉमनिक लोबो, पर्यावरणवादी  नदी सुधार प्रकल्प राबवताना नागरिकांच्या सूचना, मते जाणून घेणे गरजेचे होते. मात्र, तसे प्रशासनाने केले नाही. आता प्रकल्प प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर सूचना घेतल्या जात आहेत. हा केवळ दिखाऊपणा आहे. - सागर चिंचवडे, चिंचवड या प्रकल्पासाठी शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सूचना घेऊन सूचनांचा अंतर्भाव प्रकल्पात करण्यात येणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. त्यांना प्रकल्पाची माहिती दिली. - विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड