पुणे - मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे अशी जुनी म्हण आजही खरी ठरते, असं म्हणत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनी लोकांच्या इच्छेसाठी एकत्र यावं, असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. वेगळे लढले तर पडतात, त्यामुळे एकदा लोकांच्या इच्छेचा मान राखून एकत्र यावं असं जरांगे यांनी म्हटलं.माध्यमांशी बोलतांना जरांगे पाटील पुढे म्हणाले, मराठा आणि धनगर समाज वेगळा नसून एकच आहे. आम्ही कधी वेगळे नव्हतो आणि पुढेही वेगळे होणार नाही. धनगरांच्या पाठिंब्यावरून जरांगेंनी प्रतिक्रिया देत सांगितले की, कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगरांचा विरोध नाही. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. जरांगे यांनी मुंबईतील मोर्चाबाबत माहिती सांगितली ते म्हणाले, आगामी १९ ऑगस्टला होणारा आझाद मैदान मोर्चा हा मागील मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल. मराठा समाज आहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट मार्गे कल्याण, ठाणे, चेंबूर असा मार्ग घेत मुंबईवर धडकणार आहे. शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज घाट मार्गे मराठ्यांचा मोर्चा निघेल. हा मोर्चा कुणालाही टार्गेट करण्यासाठी नाही. माझं शरीर किती साथ देईल सांगता येत नाही, पण जाताना शिवनेरीची माती कपाळावर लावूनच जाईनदरम्यान, संजय शिरसाटांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा जात प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी रोखण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप माझ्याकडे आहे. असले चाळे थांबवा, नाहीतर वेळ वाईट येईल, असा इशारा फडणवीसांना जरांगे यांनी दिला.तत्पूर्वी,मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांच्या लढ्यानंतर नाेंदी असणाऱ्या कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यात येवू लागली. सुरूवातीला ही प्रक्रिया गतिमान हाेती. परंतु, सध्या कासवगती आली आहे. तर दुसरीकडे ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांची व्हॅलिडिटी करून मिळत नाही. शैक्षणिक आणि इतर लाभांपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजातील तरूणांनी शनिवारी राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा दाैऱ्यावर असतानाच शिंगाेली सर्किट हाऊस परिसरात त्यांना राेखले. घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. आश्वासन देण्याचा प्रयत्नही केला. परंतु, तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रत्येक वेळी आश्वासन मिळते अन् नेते निघून गेल्यानंतर पुढे काहीच हाेत नाही, अशा शब्दात राेष व्यक्त केला. तरूण ऐकण्याच्या मनस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी थेट मंत्री सिरसाट यांना फाेन केला. मराठा तरूणांचा हा प्रश्न त्यांच्या कानावर घातला. तसेच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनाही यात लक्ष घालून तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे; मनोज जरांगे पाटलांची ठाकरेंना एकत्र येण्याची हाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 17:28 IST