शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा उल्लेख 'विशेष आकर्षण'; महिलांची अवहेलना केल्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 17:46 IST

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील पाटणकर बाई ही भूमिका चर्चेत

ठळक मुद्देअपूर्वा नेमळेकर यांच्याशी होऊ शकला नाही संवाद विशेष आकर्षण ऐवजी प्रमुख पाहुणे असा उल्लेखही उचित ठरला असता

पिंपरी :सध्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील पाटणकर बाई ही भूमिका चांगलीच गाजत आहे. त्यामुळे साहजिकच ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर देखील सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.  मात्र,पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाला बुधवारी ( दि.४) काही मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र उद्घाटन सोहळयाच्या निमंत्रण पत्रिकेत ‘रात्रीस खेळ चाले ’ मधील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांची ‘ विशेष आकर्षण ’ असा उल्लेख केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनावर टीकेची चौफेर उठवली जात आहे. महिलाच्या व्यासपीठावर महिला कलावंतांची अवहेलना करणे योग्य नाही अशा प्रकारची टीकेचा सूर आळवला जात आहे.    पिंपरी चिंचवड महानागरपालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रा उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत अपूर्वा नेमळेकर यांचा उल्लेख ‘विशेष आकर्षण ’ असा केला होता. विशेष आकर्षण या शब्दाला काहीं जणांचा आक्षेप आहे. महिलांच्या व्यासपीठावर महिला कलाकाराचा अवमान करणे योग्य नाही, अशी टीका होत आहे.महापालिकेच्या जनता संपर्क विभागाच्या वतीने निमंत्रण पत्रिका छापण्याचे काम केले जाते. निमंत्रण पत्रिकांमध्ये प्रोटोकॉल पाळला जात नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता महिला कलावंताबाबत वापरण्यात आलेल्या ' विशेष आकर्षण ' या  विशेषणाने जनता संपर्क विभाग अडचणीत आला आहे.अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांच्याशी याबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही.

याबाबत महापौर महापौर उषा ढोरे म्हणाल्या, विशेष आकर्षण म्हणजे, चित्रपट मालिका यातील कलावंतांबद्दल आपल्याला आकर्षण असते. त्याअनुषंगाने वापरला असेल. पत्रिका तयार करण्याचे काम पदाधिकारी करीत नाहीत. तर प्रशासन करते. माझ्यामते विशेष आकर्षण ऐवजी प्रमुख पाहुणे असा उल्लेखही उचित ठरला असता.

टॅग्स :Apurva Nemlekarअपूर्वा नेमळेकरRatris Khel Chale 2रात्रीस खेळ चालेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस