शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थेरगाव बीआरटी, रहाटणी, काळेवाडी, वाकड परिसरामध्ये बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीला निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:52 IST

- उभ्या बेवारस वाहनांमुळे नागरिकांची गैरसोय;औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने धावतात वेगाने, सकाळ, सायंकाळी वाहतूक कोंडी झाली नित्याची, कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नियुक्त करण्याची मागणी, चाकरमान्यांना रोज कामावर जाण्यास उशीर

- महेश मंगवडे  

वाकड - थेरगाव येथील औंध-रावेत बीआरटी रस्ता, काळेवाडी रहाटणी रस्ता, तापकीर चौक ते थेरगाव रस्ता, डांगे चौक ते चिंचवड रस्ता, डांगे चौक ते भूमकर चौक, वाकडमधील दत्त मंदिर रस्ता परिसरात रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांलगत उभ्या बेवारस वाहनांमुळे नागरिकांची गैरसोय होत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने वेगाने धावतात. ज्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. विशेषतः वाकड पोलिस ठाणे ते डांगे चौक आणि वाकड रस्ता ते पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.परिसरातील रस्ते तसे प्रशस्त असले तरी बेवारस वाहने, अनधिकृत पार्किंग यामुळे वाहनचालक नेहमीच कोंडीत सापडतात. दुपारी शाळा सुटल्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. याबाबत महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे.

उपाय म्हणून सकाळ ते संध्याकाळपर्यंत वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, तसेच बेवारस वाहने, बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना द्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. चाकरमान्यांना वाहतुकीतील अडथळ्यांमुळे दररोज वेळेवर कामावर पोहोचणे कठीण जाते. सकाळ-संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. बस व रेल्वेसेवा उशिरा धावल्याने गैरसोय अधिक वाढते. यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे ही समस्या बनली आहे.

अधिकाऱ्यांनी पाहणी करून दिल्या सूचना

वाकड वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक मधुकर थोरात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या चौकाची पाहणी करून संबंधित व्यावसायिक व नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

अनधिकृत पार्किंगची ठिकाणे

एम्पायर ब्रिज ते कस्पटे वस्ती बीआरटी रस्ता, दोन्ही बाजूने.

जगताप डेअरी ते डांगे चौक बीआरटी रस्ता.

दत्त मंदिर रस्ता, वाकड.

भूमकर चौक ते बिर्ला हॉस्पिटल रस्ता.

तापकीर चौक ते थेरगाव गावठाण रस्ता.

वाहनचालक बेदरकारपणे वाहने पार्क करून सूचनांचे उल्लंघन करतात. वाहनचालकांनी सूचनांचे पालन करून व्यवस्थितपणे वाहने उभी करावी, जेणेकरून इतरांना त्याचा त्रास होणार नाही. - नितीन सावंत, नागरिक 

वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. निदर्शनास आणून देऊनही प्रशासन उपाययोजना करत नसल्याने उपमुख्यमंत्र्यांनाच निवेदन दिले आहे. - संतोष बारणे, माजी विरोधी पक्षनेते, महापालिका

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड