शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

महापालिकेत समाविष्ट होण्यास माण हिंजवडीकरांचा विरोध कायम..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:09 IST

- परिसरातील गावे महापालिकेत घेण्याऐवजी त्यांची स्वतंत्र नगर परिषद अथवा नगर पालिका करा यासाठी ग्रामपंचायती आग्रही असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.

हिंजवडी : आयटी परिसरातील गावे महापालिकेत जाणार असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. यापूर्वी विशेष ठराव मंजूर करून तसेच, राज्य सरकारला पत्र व्यवहार करून माण, हिंजवडी ग्रामपंचायतींनी महापालिकेत जाण्यास आपला विरोध दर्शवला आहे. परिसरातील गावे महापालिकेत घेण्याऐवजी त्यांची स्वतंत्र नगर परिषद अथवा नगर पालिका करा यासाठी ग्रामपंचायती आग्रही असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.

दरम्यान, हिंजवडी, माण, मारुंजीसह परिसरातील गावे महापालिकेत जाणार अशी चर्चा मागील काही वर्षांपासून सुरु आहे. अनधिकृत बांधकामे, पायाभूत सोयी सुविधांची कमतरता, वाढते नागरिकरण आणी बकालीकरण अशी कारणे पुढे करत सदर गावे महापालिकेत घेतली पाहिजे अशी भूमिका काही नेते मंडळी वारंवार घेत आहेत. मात्र, महापालिकेच्या हद्दीत सुद्धा वरील समस्या आणी पायाभूत सोयी सुविधांचा उडालेला बोजवारा पहायला मिळत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

परिसरातील ग्रामपंचायती आर्थिक दृष्टीने सदन आहेत. त्यास, पीएमआरडीए, एमआयडीसी, पीडब्लूडी आणी इतर कार्यरत प्रशासकीय यंत्रणांची प्रामाणिक आणी योग्य साथ लाभल्यास गावांचा अपेक्षित विकास होऊ शकतो असा ग्रामपंचायतींचा सुर आहे. त्यामुळे, आयटीतील गावे महापालिकेत घेण्याऐवजी त्यांची स्वतंत्र नगरपालिका अथवा नगर परिषद करा अशी आग्रही मागणी वारंवार होत आहे.

आयटीपार्कचा साठ टक्क्याहून अधिक भाग माण ग्रामपंचायत हद्दीत येतो. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामस्थांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत सक्षम आहे. याठिकाणी  कार्यरत असणाऱ्या इतर प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे आयटी परिसरात मूलभूत समस्या जाणवत आहे. मात्र, त्यासाठी महापालिका हा एकमेव पर्याय नाही. याठिकाणी स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. - अर्चना सचिन आढाव : सरपंच, माण  परिसरात वाढती लोकसंख्या पाहता मौजे हिंजवडीसह शेजारील पाच गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी. महापालिकेत समावेश होण्यास आमचा तीव्र विरोध आहे. तसा पत्रव्यवहार शासन दरबारी करण्यात आला आहे. शासनाने ग्रामस्थांच्या भावनेचा सहानुभूती पूर्वक विचार करावा. स्वतंत्र नगर पालिकेसाठी आग्रही आहोत.  - गणेश जांभुळकर : सरपंच, हिंजवडी  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र