शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

पिंंपरी चिंचवडला रेडझोनमधून वगळले, मध्यरात्रीपासून अंमलबजावणी, बाजारपेठ होणार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 22:55 IST

रुग्णवाढीचा आलेख कमी झाल्याने राज्य सरकारने रेड झोनमधून अनेक शहरे वगळली, त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश होता.

पिंपरी:  पिंपरी-चिंचवड शहरास  रेड झोन मधून वगळले असून त्याची अंमलबजावणी गुरुवार मध्यरात्रीपासून करण्यात  येणार आहे. त्यामुळे उद्यापासून बाजारपेठ खुली होणार आहे. तर चार दिवसांत पीएमपी बससेवा सुरू होणार आहे. मात्र , मॉल, चित्रपट गृहे सुरू होणार नाहीत. सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत संचारबंदी जारी असणार आहे, कटेन्मेंट झोन मधील बंदी कायम असणार आहे, असे पिपरीचिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केले आहे.

रुग्णवाढीचा आलेख कमी झाल्याने राज्य सरकारने रेड झोनमधून अनेक शहरे वगळली, त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश होता. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्ण वाढीचा आलेख गेल्या तीन दिवसांपासून वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री दहा वाजता शहराला नोन रेड झोन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी करण्यात आले आहेत. यामध्ये काही बंधने घातली आहेत, नियमावली तयार केली आहे.

या गोष्टीना असणार बंदी

 पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मेट्रो,  रेल प्रवास, शाळा-कॉलेज शैक्षणिक संस्था, हॉटेल रेस्टॉरंट, सिनेमा हॉल,  शॉपिंग सेंटर व्यायामशाळा, तरण तलाव , सभाग्रह नाट्यगृह,  सामाजिक धार्मिक,  राजकीय, क्रीडा मनोरंजन, सभा संमेलनं यास बंदी राहणार आहे. त्याचबरोबर सर्व धार्मिक स्थळे धार्मिक कार्यक्रम सभा-संमेलने होणार नाहीत.तसेच शहर परिसरामध्ये अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा व्यतिरिक्त  सायंकाळी  सात ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी राहणार आहे. त्याचबरोबर 65 वर्षावरील सर्व व्यक्ती अति जोखमीची आजार असणाऱ्या तसेच वय वर्षे दहा वयोगटातील मुलांना अत्यावश्यक सेवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.  प्रतिबंधित क्षेत्र कंटेनमेंट झोन मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य गोष्टी बंद राहणार आहेत.काय राहणार सुरू

सर्व प्रकारचे मालवाहतुकीचे ट्रक यांना वाहतुकीसाठी परवानगी राहणार आहे. तसेच क्रीडा संकुले,  स्टेडियम खुली सार्वजनिक ठिकाणे एकट्याने खेळायचे खेळ खेळ योगासने यांना परवानगी असेल. मात्र क्रिकेट,  फुटबॉल बॅडमिंटन, कबड्डी ,खो-खो  या गोष्टींना परवानगी असणार नाही. त्याचबरोबर दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे तसेच तीन चाकी मध्ये चालकांनी दोन व्यक्ती चार चाकी मध्ये चालक आणि दोन व्यक्तींना परवानगी असणार आहे.  पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये 26 मेपासून पीएमपीच्या बस 50 टक्के एवढ्या क्षमतेने वाहतूक करता येईल.  तसेच सर्व बाजारपेठेतील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी पाचच्या दरम्यान खुली राहतील. या ठिकाणी गर्दी होऊन सामाजिक शारीरिक अंतर राखण्याचे निकषाचे  उल्लंघन झाल्यास दुकाने तात्काळ बंद करण्यात येतील.  पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व औद्योगिक कंपन्यांमध्ये कामावर उपस्थित राहण्यासाठी सर्व रेडझोन क्षेत्रातून येण्यासाठी महापालिकेकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. औद्योगिक आस्थापना 100% सुरू ठेवता येईल. खाजगी कार्यालय माहिती तंत्रज्ञान विषयक अस्थपणा जास्तीत जास्त 50% मनुष्यबळाचा सुरू करता येईल.  तसेच बाजारपेठांमधील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहतील. 

तसेच चिंचवड स्टेशन , पिंपरी कॅम्प,  गांधी पेठ चिंचवड,  काळेवाडी मेन रोड,  अजमेरा पिंपरी , निगडी बस स्टॉप जकात नाका परिसर , या भागातील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वेळात समविषम तारखेस खुली राहतील. या आदेशाची अंमलबजावणी शुक्रवारी गुरुवारी मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या