शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मी सीबीआय अधिकारी बोलतोय…! पिंपरीत ३५ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:10 IST

- तब्बल ३५ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पिंपरी - स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात मोबाइलधारकांनी पिंपरीतील व्यक्तीकडून तब्बल ३५ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २२ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान मोरवाडी परिसरात घडली.या प्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व्यक्तीने शुक्रवारी (दि. १३) तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कशी झाली फसवणूक?मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत फोन केला. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार असल्याची भीती दाखवून खात्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. नंतर “प्रकरण मिटवण्यासाठी” विविध कारणे सांगून टप्प्याटप्प्याने पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. घाबरलेल्या व्यक्तीने एकूण ३५ लाख रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले. पोलिसांचा इशारापोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणताही सरकारी अधिकारी फोनवर पैसे मागत नाही. अज्ञात कॉल, व्हिडिओ कॉल किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका. संशयास्पद कॉल आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या. दरम्यान, सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.वाढत्या सायबर फसवणुकीचा ट्रेंडपिंपरी-चिंचवडसह राज्यात “सीबीआय अधिकारी”, “पोलिस अधिकारी”, “बँक अधिकारी” अशा नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. आरोपी आधी घाबरवतात आणि नंतर पैसे उकळतात. त्यामुळे OTP, बँक डिटेल्स किंवा पैशांची ट्रान्सफर करण्यापूर्वी खात्री करणे गरजेचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri: CBI Impersonator Swindles ₹35 Lakh in Online Fraud

Web Summary : Pimpri resident lost ₹35 lakh to fraudsters posing as CBI officers. Victims were threatened with false charges and coerced into transferring funds. Police urge caution against unknown calls and sharing sensitive information to prevent cyber fraud.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रcyber crimeसायबर क्राइम