शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे नाही तर...; आयटीनगरीत नवऱ्याच्या प्रेयसीचे केले अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 21:07 IST

महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. “तुमचे पार्सल द्यायचे आहे” असे सांगत ऑफिसबाहेर बोलावून घेतले.

पिंपरी : नवऱ्याचे अनैतिक संबंध थांबवण्यासाठी पत्नीने भावाला व आईला घेऊन थेट प्रेयसीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना हिंजवडी आयटी पार्कमध्ये उघड झाली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात बुधवारी (दि २१) रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास विप्रो सर्कल, ब्रम्हा क्रॉप फेज २  येथे काम करणाऱ्या महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. “तुमचे पार्सल द्यायचे आहे” असे सांगत ऑफिसबाहेर बोलावून घेतले. त्या ठिकाणी निळ्या रंगाच्या कारमधून आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई उतरले. त्यांनी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिला ताथवडे आणि वाकड परिसरात फिरवत बेदम मारहाण केली. या प्रकरणात पत्नी, तिचा भाऊ व आईविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. नवऱ्याच्या अनैतिक संबंधांना कंटाळून आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपी पत्नीने पोलिसांसमोर दिली. पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली पोलिस नियंत्रण कक्षाला अपहरणाची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये कोंबताना स्पष्ट दिसले. दिवसाढवळ्या आयटी पार्क परिसरात अपहरणाची घटना घडल्याने पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. सीसीटीव्हीवरून पोलिसांनी गाडीचा क्रमांक शोधून काढला. तब्बल दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी अपहृत महिलेचा शोध घेतला. वाकड परिसरातून कार ताब्यात घेऊन महिलेची सुटका केली. त्यानंतर घटनेचा उलगडा झाला.  'नवऱ्याचा नाद सोडून दे' अशी दिली धमकी कारमध्ये बसवून घेतल्यानंतर त्या महिलेने संतापून नवऱ्याच्या प्रेयसीला दम दिला. “माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”. त्यानंतर तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तब्बल दोन ते अडीच तास सुरू असलेल्या प्रकाराने महिला घाबरली होती.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड