शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
3
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
4
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
5
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
6
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
7
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
8
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
9
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
10
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
11
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
12
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
13
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
14
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
15
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
16
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
17
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
18
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
19
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
20
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!

लग्नातील अनिष्ट प्रथा; माजी महापौरांचा विरोध, पत्र पाठवून आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 09:24 IST

वधू-वरांना आशीर्वाद, पुढाऱ्यांचा सत्कार अशा अनिष्ट प्रथांच्या विरोधात माजी महापौर अंकुश काकडे यांनी काही वर्षापूर्वी आवाज उठवत जाहीर आवाहन केले होते

पुणे :लग्नसोहळ्यातील राजकारण्यांची उपस्थिती, त्यांच्या हस्ते वधू-वरांना आशीर्वाद, पुढाऱ्यांचा सत्कार अशा अनिष्ट प्रथांच्या विरोधात माजी महापौर अंकुश काकडे यांनी काही वर्षापूर्वी आवाज उठवत जाहीर आवाहन केले होते. वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या हुंडाबळीनंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या आवाहनाचे समाजमाध्यमावरून स्मरण करून दिले आहे. लग्नसमारंभात राजकारण्यांना निमंत्रीत करून त्यांची वाट पाहणे, त्यासाठी मुहूर्त लांबवणे, जावयाचा तसेच अन्य नातेवाइकांचा मानपान स्टेजवर करणे, अशा अनेक प्रथांच्या विरोधात अंकुश काकडे यांनी १९९६ मध्ये आवाज उठवला होता. अशा प्रथा पाडू नका, अनावश्यक गोष्टींना महत्त्व देऊ नका, पुढाऱ्यांसाठी लग्नमुहूर्त लांबवू नका, असे जाहीर आवाहन त्यांनी केले होते. तसे एक पत्रच त्यांनी छापून घेतले होते. निमंत्रण आलेल्या प्रत्येक कुटुंबाला ते हे पत्र पाठवत, आधी खातरजमा करून घेत व त्यानंतरच त्या लग्नाला उपस्थिती लावत. त्यामुळे लग्नानंतर त्या कुटुंबियांची जबाबदारी वाढत होती.

आवाहनाशी प्रामाणिक राहिलोसन १९९६ मध्ये केलेल्या आपल्या आवाहनाशी आपण स्वतः तसेच माजी आमदार उल्हास पवार व माजी मंत्री शशिकांत सुतार हे दोघे अजूनही प्रामाणिक राहिलो आहोत, अन्य कोणाकडून मात्र या साध्या गोष्टीचे पालन होत नाही. राजकीय पदाधिकारी, मंत्री, पुढारी यांनी कृपया लग्न समारंभात, तरी आपला तामझाम सोडून साधेपणाने उपस्थिती लावावा.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmarriageलग्न