शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीतील वाहतूक कोंडीबाबत आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:43 IST

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आढावा; आमदार शंकर जगताप यांच्या मागणीला यश

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे राज्य शासनाने लक्ष दिले आहे. आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, गुरुवारी (दि. १०) मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे. ही बैठक दुपारी १:४५ वाजता विधानभवनात होणार असून, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, आमदार शंकर जगताप आणि महेश लांडगे, पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी - चिंचवड महापालिकांचे आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त, पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्त, महामार्ग-मेट्रो आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

वाहतूक सुसूत्रीकरणावर भरया बैठकीत हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रमुख रस्त्यांचा विस्तार, नवीन जोडरस्त्यांची निर्मिती, उड्डाणपूल व पूल प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार आणि पार्किंगची अंमलबजावणी यावर चर्चा केली जाणार आहे.

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने बैठक आयोजित केली आहे. नागरिकांना या बैठकीतून ठोस निर्णय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाहतूक नियोजनाबाबत प्रभावी निर्णय घेतले गेले, तर हिंजवडी परिसरातील हजारो आयटी कर्मचारी, रहिवासी आणि वाहनचालकांसाठी दिलासा मिळणार आहे. - शंकर जगताप, आमदार

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी