बारामतीतून पिकअप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:15 IST2021-08-25T04:15:00+5:302021-08-25T04:15:00+5:30

बारामती :बारामती शहरातील नीरा रस्त्यावर कसब्यातून घरासमोर लावलेली पाच लाख रुपये किमतीची पिकअप जीप चोरीला गेल्याचा प्रकार घडला ...

Pickup from Baramati | बारामतीतून पिकअप

बारामतीतून पिकअप

बारामती :बारामती शहरातील नीरा रस्त्यावर कसब्यातून घरासमोर लावलेली पाच लाख रुपये किमतीची पिकअप जीप चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत शहर पोलीस ठाण्यात महिबूब अमिन शेख (रा. कसबा, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ही घटना घडली. फिर्यादी हे जनावरांचे व्यापारी आहेत. जनावरांची ने-आण करण्यासाठी ते ही जीप वापरत होते. दि. २१ रोजी रात्री त्यांनी जीपच्या (एमएच-११, बीएल-७७४७) हौद्याचे काम करायचे असल्याने ती घराजवळ छोटूभाई गॅरेज शेजारी लावली होती. सकाळी जीप जागेवर दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. परंतु कुठेही वाहन मिळून आले नाही. या जीपची किंमत पाच लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Pickup from Baramati