आळंदीत पार्किंगसाठी भाविकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 03:50 AM2017-11-27T03:50:46+5:302017-11-27T03:50:52+5:30

तीर्थक्षेत्र अलंकापुरीत खासगी तसेच पालिकेच्या पार्किंगवाल्यांकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुटमार केली जात आहे. खासगी जागा किंवा त्या जागेच्या शेजारील विनामालकी जागेत भाविकांनी पार्क केलेल्या वाहनांचेही अधिक दर लावून संबंधितांकडून बळजबरीने पैसे वसूल केले जात आहेत.

 Picketing of devotees for Alandi parking | आळंदीत पार्किंगसाठी भाविकांची लूट

आळंदीत पार्किंगसाठी भाविकांची लूट

Next

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत खासगी तसेच पालिकेच्या पार्किंगवाल्यांकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुटमार केली जात आहे. खासगी जागा किंवा त्या जागेच्या शेजारील विनामालकी जागेत भाविकांनी पार्क केलेल्या वाहनांचेही अधिक दर लावून संबंधितांकडून बळजबरीने पैसे वसूल केले जात आहेत. अडवणूक करून अव्वाच्या - सव्वा दर आकारले जात असल्याने भाविकांमध्येही प्रचंड नाराजी आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपºयातून भाविक अलंकापुरीत येत आहेत. मात्र पार्किंगच्या असलेल्या अभावामुळे भाविक मोकळ्या जागेत वाहनांची पार्किंग करून मंदिराकडे मार्गस्थ होत असतात. तर मंदिर पार्किंगच्या जागेची माहिती असलेले भाविक मंदिर पार्किंगमध्ये वाहने पार्क करून दर्शनसाठी जातात. परंतु, पहिल्यांदाच येणाºया भाविकांना पार्किंग माहीत नसल्याने असे भाविक मिळेल त्या मोकळ्या जागेत वाहने पार्क करतात. परिणामी दर्शनानंतर वाहनस्थळी जागेची पावती दाखवत खासगी जागा असल्याचे सांगून भाविकांकडे अव्वाच्या-सव्वा पैशांची मागणी करत आहेत. कायदेशीर पार्किंगवाले पालिकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा दुप्पट दराच्या रकमेची पावती छापून भाविकांच्या गळ्यात मारत आहेत.
अनेकवेळा वाहनांचे पासिंग नंबर पाहून वेगळी पावती देऊन भाविकांकडून जादा लूट केली जात असल्याची सत्यस्थिती समोर येऊ लागली आहे. वाहनानुसार ५० रुपयांपासून तब्बल ३०० रुपयांपर्यंत पार्किंगचे भाडे आकारले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी पेणच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या चार एसटी सहलीसाठी आळंदीत आल्या होत्या. माऊलींच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांचे या एसटीबसचे प्रत्येकी २०० रुपये आकारण्यात आले. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. पार्किंगच्या पावतीवर पालिकेचा शिक्का नाही, जबाबदार अधिकाºयाचे नाव नाही, बनावट पावत्या देऊन शुल्क आकारणे अत्यंत गैर असल्याचे संबंधित शिक्षकाने सांगितले.
पार्किंगचे भाडे देण्यास जर भाविकांनी नकार दिला, तर संबंधित व्यक्ती भाविकांना शिवीगाळ करून जबरदस्ती भाडे वसूल करत आहेत. पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी भाविकांमधून जोर धरू लागली आहे.

वाहन चोरीला गेले तर आम्ही जबाबदार नाही

आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून पार्क केलेल्या वाहनाचे जादा दराने पैसे उकळले जात आहे. शहरात कुठल्याही मोकळ्या जागेत वाहने पार्क करून दर्शनानंतर पुन्हा वाहनाशेजारी आल्यानंतर हातात पार्क जागेची पावती दाखवून, ही आमची खाजगी जागा असल्याचे सांगत अधिक रक्कम वसूल करण्याचा धंदा सुरू आहे.
पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनातील वस्तूंचीच काय तर वाहन जरी चोरीला गेले तरी ती आमची जबाबदारी नाही, अशी स्पष्ट सूचना पावतीवर छापणारे भाविकांना अधिक लुटत आहे.

ठेकेदारांची हमरीतुमरी...
पार्किंगसाठी अवाजवी शुल्क आकारून वाहनचालकांची लूट केली जात आहे. याबाबत विचारणा केली तर ठेकेदाराकडून दमदाटी केली जात आहे. उत्पन्नाच्या नावाखाली आळंदीत भाविकांची लूटमार केली जात आहे. यंदा पालिकेने उत्पन्नवाढीच्या दृष्टीने आपल्या मालकीच्या जागेत अथवा रस्त्यावर कुठेही गाडी पार्क करणाºयांकडून शुल्क वसुली करण्याची मुभा ठेकेदारास दिली आहे. भाविकांनी दराबाबत विचारणा केली तर लगेच ठेकेदाराचे कर्मचारी हमरीतुमरीवर येत आहेत. पालिकेने ठेकेदाराला समज देणे आवश्यक आहे. पार्किंगच्या दराबाबत फलक लावून पालिकेची अधिकृत पावती द्यावी. लूटमार थांबवण्यासाठी पावती पुस्तकेही पालिकेनेच छापून द्यावीत. ही लूटमार त्वरित न थांबल्यास जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करणार आहे.
- संदीप नाईकरे, कार्यकर्ता, आळंदी विकास मंच

पार्किंगसाठीचे पालिकेचे दर अवाजवी आहेत. भाविकांना ठेकेदाराकडून होणारी दमबाजी रोखण्याबाबत पालिकेशी पत्रव्यवहार केला जाणार आहे.
- नंदकुमार गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक आळंदी.
दरवर्षीपेक्षा २४ लाखांनी जादा उत्पन्न पालिकेला मिळणार आहे. संपूर्ण गावात पार्किंग शुल्क आकारण्यास ठेकेदारास सांगितले आहे.
- समीर भूमकर,
मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद.

Web Title:  Picketing of devotees for Alandi parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.