शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

संघनीतीच्या प्रचाराचे चिंचवडमध्ये फुलले कमळ

By admin | Updated: February 25, 2017 02:22 IST

महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. चिंचवड विधानसभेतील एकूण ५२ जागांपैकी ३४ जागा भाजपाला मिळाल्या

विश्वास मोरे, चिंचवडमहापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. चिंचवड विधानसभेतील एकूण ५२ जागांपैकी ३४ जागा भाजपाला मिळाल्या. आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे कुशल नेतृत्व, मतदानाचा वाढलेला टक्का, संघनीतीने केलेला प्रचार, निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी रोखण्यात मिळालेले यश याचा एकत्रित परिणाम भाजपाने चिंचवड विधानसभेत घेतलेली मुसंडी होय. चिंचवड हा वैचारिक प्रगल्भता लाभलेला मतदारसंघ आहे. गड राखण्यात भाजपला यश मिळाले.गेल्या दोन वर्षांत जगताप यांनी महापालिकेतील गैरकारभाराची लक्तरे वेशीवर टांगली. जनतेसमोर पुढे आणली आणि भारतीय जनता पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होऊ लागले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगतापांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांनी एकामागोमाग राष्ट्रवादीतील नगरसेवक, पदाधिकारी भाजपात आणण्यास सुरुवात केली. तब्बल २२ नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना त्यांनी भाजपात नेले. दुसरीकडे महापालिकेत फक्त चिंचवड विधानसभेत भाजपाचा एक नगरसेवक होता. पक्षबांधणी, जुन्या-नव्याची मोट बांधण्याचे कामही केले. महत्तवाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्वेक्षणात शिवसेना-भाजपाची युती झाली, तर सत्ता येईल, असा अहवाल होता. त्यासाठी जगताप यांनी शिवसेनेसमोर मदतीचा हात पुढे केला. मात्र, जागांच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांत एकमत झाले नाही. दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. संघाची नीती, जुन्या-नव्यांचा साधलेला मेळ, बंडखोरी रोखण्यात मिळालेले यश, लक्ष्मण जगताप यांनी कार्यकर्त्यांना दिलेली ताकत, मतदानाची वाढलेली टक्केवारी याचा एकत्रित परिणाम म्हणजे महापालिका निवडणुकीत चिंचवड विधानसभेत यश मिळाले. एका जागेवरून भाजपा ३४ जागांवर पोहोचली. शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या थेरगाव व वाकड परिसरात पीछेहाट झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस, मनसेची पुरती वाट लागली. गेल्या महापालिका निवडणुकीत ३८ वर असणारी राष्ट्रवादी काँग्रेस ९ वर आली. दहावर असणारी शिवसेना सहावर आली, तर सातवर असणाऱ्या काँग्रेसचा भोपळा झाला. पक्षाने डावलले असतानाही नवनाथ जगतापांसारखे तीन जण अपक्ष म्हणून निवडून आले. वाकड, पिंपळे निलख, सांगवी, पिंपळे गुरव, काळेवाडी, थेरगावचा काही भाग, चिंचवड स्टेशन, वाल्हेकरवाडी या परिसरात ‘मोदी’ लाटेचा परिणाम जाणवला. पॅनलच्या पॅनल निवडून आले. महापौर शकुंतला धराडे, स्थायी समितीच्या माजी सभापती शमीम पठाण, विद्यमान नगरसेवक आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, विलास नांदगुडे, माजी विधी समिती सभापती सतीश दरेकर, कैलास थोपटे, राजेंद्र जगताप, वैशाली जवळकर, नगरसेविकासुषमा तनपुरे, स्वाती कलाटे, आशा सूर्यवंशी, अ‍ॅड. संदीप चिंवडे, अनंत कोऱ्हाळे, अनिता तापकीर, विमल जगताप, बाळासाहेब तरस, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे आदी मातब्बर पराभूत झाले. तुषार कामठे, सचिन चिंचवडे, बाळासाहेब ओव्हाळ, करुणा चिंचवडे, प्रज्ञा खानोलकर, माधुरी कुलकर्णी, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, अर्चना बारणे, मनीषा पवार, अश्विनी वाघमारे, रेखा दर्शिले, राहुल कलाटे, मयूर कलाटे, ममता गायकवाड, संदीप कस्पटे, सचिन भोसले, निर्मला कुटे, बाबा त्रिभुवन, सुनीता तापकीर, सविता खुळे, उषा काळे, हर्षल ढोरे, शारदा सोनवणे, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, माधवी राजापुरे, सीमा चौघुले, सागर अंघोळकर, उषा मुंडे, शशिकांत कदम, चंदा लोखंडे अशा नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. विद्यमान नगरसेविका जयश्री गावडे, अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर भोंडवे, नीलेश बारणे, झामा बारणे, मयूर कलाटे, संगीता भोंडवे, माया बारणे, शीतल शिंदे, नाना काटे, शत्रुघ्न काटे यांना गड वाचविण्यात यश मिळाले. खासदार श्रीरंग बारणे यांनी विशेष लक्ष घालूनही भाजपाच्या तुलनेत फारसे यश मिळू शकले नाही. एकूणच महापालिका निवडणुकीत चिंचवड विधानसभा परिसरात लक्ष्मण जगताप किंगमेकर ठरले आहेत.