शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या सभागृहातील भाषणात अटलजींच्या उदारमतवादी चेहऱ्याचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 19:28 IST

तत्कालीन राजकीय परिस्थिती तणावाची होती. समाजातही अस्वस्थता नांदत होती. त्याचा अचूक संदर्भ वाजपेयी यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केलेल्या भाषणात दिला.

ठळक मुद्देवक्तृत्व कलेला दिलेल्या योगदानाबद्धल महापालिकेचे मानपत्र कार्यक्रमात कलाक्षेत्रातील व्यक्तींचा गौरव महापालिकेने करावा अशी सुचनाही

पुणे : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यात येत असतो.अटलबिहारी वाजपेयी यांना महापालिकेने सन १९८७ मध्ये असेच मानपत्र त्यांनी वक्तृत्वकलेला दिलेल्या योगदानाबद्धल दिले होते. त्यावेळी केलेल्या भाषणातून वाजपेयी यांनी आपल्या उदारमतवादाचे दर्शन श्रोत्यांना घडवले होते. त्याची आठवण आजही महापालिकेशी संबधित अनेकांना आहे. तत्कालीन राजकीय परिस्थिती तणावाची होती. समाजातही अस्वस्थता नांदत होती. त्याचा अचूक संदर्भ वाजपेयी यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केलेल्या भाषणात दिला. मतांवर लक्ष ठेवून प्रत्येक कृती होत असल्याने देशातील समस्या वाढत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ते म्हणाले ‘‘लोकशाही व्यवस्थेत मतभेद असलेच पाहिजेत, मात्र मनभेद होता कामा नये. राजकारण हे सेवेचे साधन आहे. सत्ता हीसुद्धा सेवेसाठी आहे व विरोधसुद्धा सेवा चांगली व्हावी यासाठीच असला पाहिजे. समान समस्या असतील त्यावेळी सर्वांनी एकत्र येत प्रश्नांचा सामना करायला हवा.’’ राजकारण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, मात्र राजकारणातील व्यक्तींचा गौरव करण्याऐवजी समाजावर परिणाम करणाऱ्या सांस्कृतिक, साहित्यिक, संगीत, अशा कलाक्षेत्रातील व्यक्तींचा गौरव महापालिकेने करावा अशी सुचनाही त्याच कार्यक्रमात वाजपेयी यांनी केली.उल्हास बा. ढोले पाटील महापौर असताना हे मानपत्र देण्यात आले. प्रा. शंकरराव खरात, प्रा. रामकृष्ण मोरे असे विविध मान्यवर त्यावेळी सभागृहात उपस्थित होते. ते सगळेच वाजपेयींच्या भाषणाने प्रभावीत झाले होते.  पालिकेने दिलेल्या मानपत्रामध्ये ‘अंधारात प्रकाश निर्माण करण्याचे, पिचलेल्या मनाला संजीवनी देण्याचे, दगडाला जाग आणण्याचे सामर्थ्य आपल्या वक्तृत्वात आहे’ अशा शब्दात त्यांच्या वाकपटुत्वाचा गौरव करण्यात आला होता. 

टॅग्स :PuneपुणेAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका