शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
2
...तर विधानसभेला आम्ही भाजपलाही मतदान करणार नाही; पंकजा मुंडे समर्थक आक्रमक
3
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
4
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
5
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
6
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
7
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
8
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"
9
Chandrakant Patil : लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली; चंद्रकांत पाटलांनी केलं कौतुक
10
बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...
11
IND vs PAK मॅचबद्दल प्रश्न विचारला; सुरक्षा रक्षक संतापला, YouTuber ची गोळ्या झाडून हत्या
12
Tata Motorsची मोठी घोषणा, लवकरच कर्जमुक्त होणार JLR, EV साठीही एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स उघडणार 
13
संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...
14
"उद्योगपती सत्ताधाऱ्यांसमोर खरे बोलणे टाळतात, पण राहुल बजाज..."; उदय कोटक यांनी सांगितली आठवण
15
Nitanshi Goel : आईने सोडली सरकारी नोकरी, वडिलांनी बंद केला व्यवसाय; 'फूल कुमारी' अशी झाली स्टार
16
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ठिणगी; नाना पटोलेंचे फोन घेणंही उद्धव ठाकरेंनी टाळलं?
17
Tata Punch EV ते Nexon EV पर्यंत... 'या' 3 इलेक्ट्रिक कारवर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूट!
18
सेन्सेक्स घसरणीसह बंद, Kotak Bank घसरला; ओएनजीसी-PSU बँकांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी
19
Nokia 3210 4G भारतात लाँच! YouTube सोबतच UPI पेमेंटची सुविधा, किंमत फक्त ३,९९९!
20
T20 World Cup 2024 Super 8 Scenario : दक्षिण आफ्रिकेचे Super 8 मधील स्थान पक्के; जाणून घ्या पाकिस्तानसह अन्य गटांमध्ये कोणाला बसणार धक्के

पेट्रोलियम कंपन्या पिताहेत नफा; घटलेल्या दराचा फायदा ग्राहकांना देण्यात केंद्र सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 2:23 PM

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलचे प्रति बॅरल भाव अगदी ३० डॉलरच्या घरात गेले होते. सध्या देखील त्याचे भाव ५७ डॉलरच्या आसपासच फिरत आहेत. मात्र, घटलेल्या या दराचा फायदा ग्राहकांना देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देसर्व नफा या सरकारी पेट्रोलियम कंपन्यांच्या घशात जात असल्याचे वास्तवइंडियन आॅईल कंपनीचा नफा अवघ्या तीन वर्षांत ५ हजार कोटींवरुन २० हजार कोटींच्या घरात

विशाल शिर्के पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलचे प्रति बॅरल भाव अगदी ३० डॉलरच्या घरात गेले होते. सध्या देखील त्याचे भाव ५७ डॉलरच्या आसपासच फिरत आहेत. मात्र, घटलेल्या या दराचा फायदा ग्राहकांना देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून मिळणारा हा सर्व नफा या सरकारी पेट्रोलियम कंपन्यांच्या घशात जात असल्याचे वास्तव आहे. इंडियन आॅईल कंपनीचा नफा अवघ्या तीन वर्षांत ५ हजार कोटींवरुन २० हजार कोटींच्या घरात गेला आहे.   देशात सर्वप्रकारच्या वाहनांची संख्या सुमारे २५ कोटींच्यावर आहे. तसेच उद्योगांची देखील दररोज कोट्यवधी लिटर्सची मागणी असते. त्यामुळे इंधनाचे भाव नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय राहीला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे भाव वाढल्यास त्याचे तत्काळ परिणाम स्थानिक बाजारावर दिसून येतात. तेथे भाव वाढ झाली की, स्थानिक बाजारातील भाव वाढतात, असे व्यवहारीक कारण केंद्र सरकारकडून सांगितले जात होते. काही वर्षांपूर्वी अगदी १४७ डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत क्रूड आॅईलचा भाव गेला होता. त्यावेळी अर्थातच दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर २०१३मध्ये ९५ डॉलर प्रतिबॅरल क्रूड आॅईलचा भाव होता. तसेच २०१४ मध्ये ८८, २०१५मध्ये ४२, २०१६मध्ये ३० ते ५२ डॉलरदरम्यान भाव राहीले आहेत. इतके भाव कमी होऊन देखील सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात हात आखडा घेत आहे. आंतरराष्ट्रीय दर शंभर डॉलर प्रतिबॅरल गेल्यानंतरही ८० रुपये प्रतिलिटर असणारे पेट्रोल आजही ७७ ते ८० रुपये प्रतिलिटर दरानेच मिळत आहे.   इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या मोठ्या आॅईल कंपन्यांच्या माध्यमातून देशभरात इंधनाचा पुरवठा करण्यात येतो. या तीनही कंपन्यांची २०१४ मध्ये ८ लाख ८० हजार ६७५ कोटी रुपयांची उलाढाल होती. ती २०१५-१६ मध्ये ७ लाख १७ हजार ६९१ कोटी रुपये झाली. तर २०१६-१७मध्ये ही उलाढाल ८ लाख ९४ हजार ४० कोटींवर पोहोचली. या काळातील कर भरणा केल्यानंतरचा या कंपन्यांचा नफा पाहिल्यास त्यात तीन वर्षांत अडीच पट वाढ झाल्याचे दिसून येते. या तिनही कंपन्यांचा मिळून २०१४-१५ साली १३ हजार ९१ कोटींचा नफाचा होता. तो २०१५-१६मध्ये २१ हजार ६९४ आणि २०१६-१७मध्ये ३३ हजार ३५४ कोटींवर गेला. उलाढाल साधारण तितकीच नफा मात्र शतप्रतिशत वाढल्याचे दिसून येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल सारडा यांना पेट्रोलियम मंत्रालयाने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे. 

आॅईल कंपन्यांची उलाढाल (रक्कम कोटी रुपयांत)कंपन्या                                         २०१४-१५    २०१५-१६    २०१६-१७इंडियन आॅईल कर्पोरेशन               ४,३६,३९०    ३,४९,३२१    ४,३८,६९२हिंदुस्थान पेट्रोलिय कॉर्पोरेशन       २,०६,३८०    १,७९,२८१    २,१३,४८९भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन          २,३७,९०५    १,८९,०९८    २,४१,८५९

करभरणा केल्यानंतरचा नफा (रक्कम कोटी रुपयांत)कंपन्या                                          २०१४-१५    २०१५-१६    २०१६-१७इंडियन आॅईल कर्पोरेशन                ५,२३७        १०,३९९        १९,१०६हिंदुस्थान पेट्रोलिय कॉर्पोरेशन        २,७३३        ३,८६३          ६,२०९भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन            ५,०८५        ७,४३२          ८,०३९

आॅईल कंपन्यांची उलाढाल अर्थसंकल्पाच्या ४० टक्के देशातील तीनही आॅईल कंपन्यांची २०१६-१७मधील उलाढाल ८ लाख ९४ हजार कोटी रुपये इतकी होती. फेब्रुवारी २०१७मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प २१.४७ लाख कोटी रुपयांचा होता. त्याच्याशी तुलना केल्यास आॅईल कंपन्यांची उलाढाल ही अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या ४१ टक्के इतकी होते. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार