पेट्रोलपंपांवर पुन्हा ठणठणाट

By Admin | Updated: August 20, 2014 00:11 IST2014-08-20T00:11:58+5:302014-08-20T00:11:58+5:30

बँकांना असलेल्या सलग सुट्टय़ा, काही ऑईल कंपन्यांचा इंधन वितरणातील नियोजनाचा अभाव यामुळे शहरातील बहुतांश पेट्रोल पंप बंद होते.

Petrol pumps again | पेट्रोलपंपांवर पुन्हा ठणठणाट

पेट्रोलपंपांवर पुन्हा ठणठणाट

पुणो : बँकांना असलेल्या सलग सुट्टय़ा, काही ऑईल कंपन्यांचा इंधन वितरणातील नियोजनाचा अभाव यामुळे शहरातील बहुतांश पेट्रोल पंप बंद होते. परिणामी पुणोकरांना मंगळवारीदेखील इंधन आणीबाणीला सामोरे जावे लागले. दरम्यान, बुधवारी (दि. 2क्) इंधनपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पुरवठा अधिकारी धनाजी पाटील यांनी दिली. तर सोलापूर, मुंबई, नगर येथून इंधनाचा पुरवठा करण्यात येत असून, शहरात कोणतीही इंधनटंचाई नसल्याची माहिती भारत पेट्रोलियम कंपनीच्या (बीपीसीएल) एका अधिका:याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. 
गेले चार दिवस बँकांना सलग सुट्टय़ा असल्याने अनेक पेट्रोल डिलर्सना इंधन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंपातील इंधनसाठा संपला होता. परिणामी बहुतांश पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. मंगळवारी हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपी) व इंडियन ऑईल कंपनीचे पेट्रोल पंप सुरु होते. तर अनेक ठिकाणचे बीपीसीएलचे पंप बंद असल्याचे 
चित्र होते. जिल्ह्यातील 14क् ते 16क् पंप बंद असल्याची माहिती सूत्रंनी दिली. मात्र, बीपीएसीसह ऑईल कंपन्यांच्या अधिका:यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही. 
बँकांना सलग सुट्टय़ा असल्याने एचपीसीएल कंपनीला उधारीवर इंधनपुरवठा करण्याची विनंती संघटनेचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी केली होती. त्याप्रमाणो कंपनीने विनंती मान्य करीत इंधनपुरवठा केला. मात्र, बीपीसीला इंधन पुरवठय़ाचे नियोजन करता आले नसल्याने काही पेट्रोल पंप बंद होते, अशी माहिती पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिली. टिळक चौकातील मध्यवर्ती पंपासह अनेक पंपांवर दुपारी 1 नंतर मोठी रांग होती. यामुळे दुचाकीस्वारांचा संताप झाला. काही जणांना पंपाजवळच्या रस्त्यांवर वाहने लावून जाण्याची वेळ आली. दुचाक्या अन्य पेट्रोलपंपांवर नेल्यावर तेथेही बंद असल्याचे पाहून दुचाकीस्वारांना वाहने बंद करून ठेवून पायपीट करण्याचा, बसने, रिक्षाने प्रवास करण्याचा पर्याय चोखाळावा लागला. रात्री उशिरार्पयत पंप सुरू होण्याची शक्यता नसल्याने दुचाक्या बेवारस अवस्थेत रस्त्यांच्या कडेला लावाव्या लागत असल्याची तक्रार काही दुचाकीस्वारांनी व्यक्त केली.
 टाक्यांमध्ये पेट्रोलच शिल्लक नसल्याचे पंपावरील कर्मचारी सांगत होते. मात्र, वाहनचालक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने वादावादीचे प्रकार झाले. काही पंपांवर डिङोलचा साठा असल्याने ते अंशत: सुरू होते.
 
च्बीपीसीचे जिल्ह्यातील सर्व पंप सुरु असून, इंधनटंचाई नाही. तुरळक ठिकाणी काही तासांसाठी पेट्रोल पंप बंद होते. राज्यातील इतर डेपोतून पेट्रोल-डिङोलचा पुरवठा करण्यात येत असल्याचे ‘बीपीसी’तील एका अधिका:याने सांगितले. 
 
 बँकांच्या सलग सुट्टय़ांमुळे इंधन पुरवठय़ावर काहीसा परिणाम झाला होता. मात्र, सोलापूर, नगर व मुंबई डेपोतून इंधन मागविण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी इंधनपुरवठा सुरळीत होईल.
- धनाजी पाटील 
पुरवठा अधिकारी

 

Web Title: Petrol pumps again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.