पुण्यातील पेट्रोलपंप उद्यापासून राहणार सकाळी आठ ते दुपारी ४ पर्यंत सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:13 PM2020-03-20T19:13:51+5:302020-03-20T19:15:34+5:30

पुणे शहराबाहेरील पेट्रोलपंप सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती

The petrol pump will be open from 8am to 4 pm from tomorrow in pune |  पुण्यातील पेट्रोलपंप उद्यापासून राहणार सकाळी आठ ते दुपारी ४ पर्यंत सुरु 

 पुण्यातील पेट्रोलपंप उद्यापासून राहणार सकाळी आठ ते दुपारी ४ पर्यंत सुरु 

Next
ठळक मुद्देपुण्यातील कोरोना बाधितांची संख्या पोहचली २१ वर

पुणे : कोरोनाचे महाभयंकर संकट जागतिक स्तरावर थैमान घालत आहे. त्याचा भारतातील व राज्यातील प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. त्याच धर्तीवर शाळा महाविद्यालये, सिनेमागृह, बाजारपेठा, छोटे मोठे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील केली जात आहे. आता शहरातील पेट्रोलपंप देखील उद्या(शनिवार दि. २१) पासून सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंतच सुरु राहणार आहे. तसेच पुणे शहराबाहेरील पेट्रोलपंप सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती पेट्रोल डिलर असोसिएशनने दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ३१ मार्चपर्यंत लागू असणार आहे. 
  पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या २१ वर पोहचली असून जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली गेली असून आवश्यक ती पावले उचलली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आयटी ऑफिसेस, कार्यालये बंद ठेवण्याचा तर अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यां ना वर्क फ्रॉम होम काम करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे आता सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याच आदेशाला प्रतिसाद देत पेट्रोल पंप  असोसिएशननेदेखील उद्यापासून पेट्रोलपंप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
  

Web Title: The petrol pump will be open from 8am to 4 pm from tomorrow in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.