‘स्कीन टू स्कीन’ निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका : अ‍ॅड. लाकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:58+5:302021-02-05T05:20:58+5:30

या विषयी भारतीय स्त्री शक्तीच्या अ‍ॅड. प्रतिमा एन. लाकरा यांनी सांगितले, की नागपूर खंडपीठाचा निर्णय अतिशय संकचित आणि धक्कादायक ...

Petition in the Supreme Court against the 'Skin to Skin' decision: Adv. Lakra | ‘स्कीन टू स्कीन’ निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका : अ‍ॅड. लाकरा

‘स्कीन टू स्कीन’ निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका : अ‍ॅड. लाकरा

या विषयी भारतीय स्त्री शक्तीच्या अ‍ॅड. प्रतिमा एन. लाकरा यांनी सांगितले, की नागपूर खंडपीठाचा निर्णय अतिशय संकचित आणि धक्कादायक आहे. यामुळे ‘पोक्सो’कायद्याच्या मूळ गाभ्यालाच हरताळ फासण्याचे काम केले आहे. पोक्सो कायद्याच्या कलम ७ नुसार जर कोणी व्यक्ती लैंगिक उद्देशाने लहान मुलांचे गुप्तांग, छातीला जबरदस्तीने हात लावत असेल तर अशा व्यक्तीला लैंगिक छळाचे दोषी समजले जाईल व कलम ८ नुसार गुन्हेगाराला शिक्षा दिली जाईल. इतक्या स्पष्टपणे कायद्यात उल्लेख असताना त्याच अतिशय सरळधोपट इंटरप्रिटेशन करून असा विचलित करणारा निर्णय दिला आहे.

पोक्सो कायदा हा लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार व त्यामुळे मनावर होणाऱ्या आघाताविरोधात आहे. यामध्ये मुलांचे हित आणि संरक्षण महत्त्वाचे आहे, असे अ‍ॅड. प्रतिमा एन. लाकरा यांनी सांगितले.

Web Title: Petition in the Supreme Court against the 'Skin to Skin' decision: Adv. Lakra